मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: गौतम गंभीरनं निवडली पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग XI, पंत-कार्तिकपैकी कुणाला दिली संधी?

T20 World Cup: गौतम गंभीरनं निवडली पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग XI, पंत-कार्तिकपैकी कुणाला दिली संधी?

गौतम गंभीर

गौतम गंभीर

T20 World Cup: गौतम गंभीरनं आपली प्लेईंग इलेव्हन निवडताना म्हटलंय की 'टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीत बदल करण्याची गरज नाही. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सुपर फॉर्ममध्ये आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इ्ंडिया आपल्या पहिल्या लढतीसाठी सज्ज आहे. भारत आणि पाकिस्तान संघातला हा सामना येत्या रविवारी होणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचा सध्या कसून सराव सुरु आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि 2007 सालच्या टी20 विश्वविजयाचा शिल्पकार गौतम गंभीरनं महामुकाबल्यासाठी प्लेईंग इलेव्हन निवडली आहे.

गंभीरच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला स्थान?

गौतम गंभीरनं आपली प्लेईंग इलेव्हन निवडताना म्हटलंय की 'टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीत बदल करण्याची गरज नाही. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सुपर फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची जागा कन्फर्म आहे. पण याच टीममध्ये गंभीरनं रिषभ पंतला स्थान देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

कार्तिकऐवजी पंत

टीम इंडियानं वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या दोन्ही सराव सामन्यात खराब कामगिरी केली होती. पण तरीही गंभीरनं कार्तिकऐवजी युवा रिषभ पंतवर विश्वास टाकला आहे. गंभीरच्या मते कार्तिक फिनिशरच्या भूमिकेत चांगली कामगिरी बजावू शकतो. पण रिषभ पंतला लवकर विकेट पडली तर वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवता येईल.

हेही वाचा - T20 World Cup: वेस्ट इंडिजवर आली बॅग भरण्याची वेळ... टी20 वर्ल्ड कप इतिहासात 'हे' पहिल्यांदाच घडलं!

गंभीरचा कोणत्या बॉलर्सवर विश्वास?

बॉलिंग लाईन अप पाहिली तर गौतम गंभीरनं अक्षर पटेलला सगळ्यात वरच्या स्थानावर ठेवलं आहे. गंभीरनं अनुभवी रवीचंद्रन अश्विनऐवजी चहलला प्राधान्य दिलंय. चहल गेल्या काही सामन्यात विकेटसाठी झगडताना दिसतोय. पण गंभीरच्या मते अजूनही चहल हीच टीम इंडियाची पहिली पसंत आहे.

वेगवान गोलंदाजांचा विचार करता शमीला गंभीरनं पहिली पसंती दिली आहे. शमीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सराव सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केली होती. या ओव्हरमध्ये शमीनं तीन विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. शमीनंतर गंभीरनं युवा हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंगची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे.

गंभीरची प्लेईंग इलेव्हन - रोहित, राहुल, विराट, सूर्यकुमार, रिषभ, हार्दिक, अक्षर, भुवनेश्वर, अर्शदीप, चहल, शमी

First published:

Tags: Gautam gambhir, Sports, T20 world cup 2022