जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: 0,4,6,0,4,0... किवी टीमच्या 'या' प्लेयरनं सुपर-12 फेरीची केली दणक्यात सुरुवात, Video

T20 World Cup: 0,4,6,0,4,0... किवी टीमच्या 'या' प्लेयरनं सुपर-12 फेरीची केली दणक्यात सुरुवात, Video

फिन अॅलन

फिन अॅलन

T20 World Cup: युवा सलामीवीर फिन अॅलन आणि डेवॉन कॉनवेनं न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. अॅलननं पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा चांगलाच समाचार घेतला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सिडनी, 22 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम सुपर-12 फेरीला आजपासून सुरुवात झाली. या फेरीत सलामीलाच गाठ पडली ती गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि उपविजेते न्यूझीलंड संघांमध्ये. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जातोय. त्यामुळे यजमान संघ सुरुवातीपासूनच वर्ल्ड कप मध्ये वर्चस्व गाजवेल आणि घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवेल असं वाटलं होतं. पण न्यूझीलंडच्या एका युवा फलंदाजानं हा अंदाज फोल ठरवला आणि किवी संघाला एक वेगवान सुरुवात करुन दिली. फिन अॅलनचा तडाखा युवा सलामीवीर फिन अॅलन आणि डेवॉन कॉनवेनं न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. अॅलननं पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं दोन फोर आणि एका सिक्ससह 14 धावा वसूल केल्या. स्टार्कच्या त्या ओव्हरचं पृथ:करण होतं, 0,4,6,0,4,0. त्यानंतर अॅलननं हेजलवूड, कमिन्स आणि स्टॉयनिसच्या गोलंदाजीवरही हल्ला चढवला. हेजलवूडच्या बॉलवर आऊट होण्यापूर्वी त्यानं अवघ्या 16 बॉल्समध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 42 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीमुळे न्यूझीलंडनं  पहिल्या सहा ओव्हरमध्ये म्हणजेच पॉवरप्लेमध्ये 1 बाद 65 धावा केल्या.

जाहिरात

गप्टिलऐवजी फिनवर विश्वास टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत टॉप 3 मध्ये असणारा मार्टिन गप्टिल या सामन्यात खेळला नाही. त्याच्याऐवजी कॅप्टन विल्यमसननं अॅलनला संधी दिली. त्यानं आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

हेही वाचा -  T20 World Cup: गौतम गंभीरनं निवडली पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग XI, पंत-कार्तिकपैकी कुणाला दिली संधी? ग्रुप ऑफ डेथ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सुपर 12 मध्ये ग्रुप 1 मध्ये आहेत. या गटात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह इंग्लंड, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतून आलेले श्रीलंका आणि आयर्लंड हे तगडे संघ आहेत. त्यामुळे या गटातून अव्वल दोन संघ कोण असणार हे सांगणं कठीण आहे. म्हणूनच हा ग्रुप ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात