विशाखापट्टणम, 21 ऑक्टोबर: आज संध्याकाळी भारतीय क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक घटना घडली. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा सुरु आहेत. त्यात ज्युनियर क्रिकेटपासून महिलांच्या क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. याच दरम्यान एका महिला क्रिकेट संघाच्या बसला सामन्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अपघात झाला आहे. त्यात संघातील पाच सदस्यांना दुखापत झाली आहे. बडोदा महिला संघाच्या बसला अपघात बडोदा सिनियर महिला क्रिकेट संघ विशाखापट्टणमध्ये सामना खेळून पुन्हा बडोद्याला जात होता. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वर संघाच्या बसला एका लॉरीने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसमधील 4 खेळाडू आणि मॅनेजर नीलम गुप्ता यांना दुखापत झाली. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं.
Andhra Pradesh | A women's cricket team bus met with an accident as it collided with a truck in Gnanapuram, Visakhapatnam earlier today. 4 players & coach were injured; all were admitted to a pvt hospital. After treatment, they went to Vadodara today evening: Visakhapatnam Police pic.twitter.com/VBCboHaQN3
— ANI (@ANI) October 21, 2022
सकाळी घडला अपघात हा अपघात सकाळी 7 च्या सुमारास घडला. टीमच्या बससमोर असलेल्या एका कारचालकानं हायवेवर अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी ज्या बसमधून महिला क्रिकेटर प्रवास करत होते त्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. बडोद्याचा संघ यावेळी विझाग विमानतळाच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या बडोद्याच्या खेळाडूंमध्ये केशा पटेल, अमृता जोसेफ, प्रग्या रावत आणि निधी धुमानिया यांचा समावेश होता. दरम्यान जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आणि त्यानंतर आज संध्याकाळी ते बडोद्यासाठी रवाना झाले.