JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Robbery Case : पुणे की बिहार! बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून भर दिवसा लाखो रुपयांना लुटले

Pune Robbery Case : पुणे की बिहार! बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून भर दिवसा लाखो रुपयांना लुटले

किराणा दुकानदाराच्या घरात भर दिवसा घुसून दरोडेखोरांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 जानेवारी : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानदाराच्या घरात भर दिवसा घुसून दरोडेखोरांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. यात तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण साडे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना काल(दि.10) दुपारी घडली. या जबरी चोरीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चंपालाल मुथा यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुथा जेवण करण्यासाठी तळेगाव येथील घरी आले. त्याच वेळी चार अनोळखी व्यक्ती मुथा यांच्या घरात घुसले. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. थेट मुथा आणि त्यांच्या कुटुंबीयांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

हे ही वाचा :  पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, धमक्या देत हजारोंचा चुनाही लावला, गोंदियातून तोतयाला अटक

संबंधित बातम्या

त्यामुळे मुथा कुटुंबीय भयभीत झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी मुथा यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर दरोडेखोर त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जाहिरात

हे ही वाचा :  हफ्ता थकला अन् वसुलीभाई घरी पोहोचले, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्सचे ऑफिस फोडले

सोसायटीच्या गेटवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत, तर तळेगांव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. दरोडा प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून पुण्यात दहशत माजवणे, जबरी चोऱ्या या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या