राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 10 जानेवारी : राज्यातून दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. विदर्भातही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता बुलडाणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंदियाचा तोतया पोलीस अधिकाऱ्याला बुलढाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोंदिया येथून तोतया पोलीस अधिकाऱ्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. काय आहे संपूर्ण प्रकरण - अनेकांना फोन लावून पोलीस अधिकारी बोलतोय, म्हणत धमकी देणाऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने गोंदिया येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले आहे. किशोर ससाने (वय 24 वर्ष) असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. तो देडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. एलसीबीमधून पीआय कदम बोलतो, अशी बतावणी करत या भामट्याने अनेकांना आणि पोलिसांना सुद्धा धमक्या दिल्या आहे. याप्रकरणी धाड आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आदखलपात्र स्वरूपाची तक्रार सुद्धा दाखल आहे. फोनद्वारे अधिकारी असल्याची बतावणी करत या भामट्याने काहींना हजारों रुपयांचा चुना सुद्धा लावलेला आहे. हेही वाचा - पुण्यात चाललंय काय? कोयता गँगनंतर आता गावठी पिस्तूल आढळल्याने खळबळ अशाच प्रकारे धाड येथील वैभव मोहिते यांना बुलढाण्यात असताना 12 डिसेंबर रोजी एलसीबी मधून पीआय कदम बोलतो, अशी बतावणी करत धमक्या दिल्या. यावरून वैभव मोहिते यांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने गोंदिया येथून तोतया अधिकारी असणाऱ्या किशोर ससाने याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.