JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Police Arrest Theft : स्वत:च्या मृत्यूचा बनाव; वर्षभर पोलिसांना फसवलं, अखेर सत्य आलं समोर, पुणे पोलिसांची कारवाई

Pune Police Arrest Theft : स्वत:च्या मृत्यूचा बनाव; वर्षभर पोलिसांना फसवलं, अखेर सत्य आलं समोर, पुणे पोलिसांची कारवाई

पुण्यातील कोथरूडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपला मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या भामट्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 03 फेब्रुवारी : पुण्यातील कोथरूडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपला मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या भामट्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. कारची चोरी करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झालेल्या चोरट्याचा वेगळाच प्रताप समोर आला आहे. कार चोरी केल्यानंतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला होता. एवढेच नाही, तर मध्य प्रदेशातील एका स्थानिक वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत बातमी छापून आणली होती.

मात्र, त्याने केलेला कारनामा अखेर कोथरूड पोलिसांनी उघड केला आहे. वर्षभरापूर्वी कोथरूड भागातून मोटार चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात चोरटा जिवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरूड भागात पंक्चरचे दुकान होते.

हे ही वाचा :  जवळच्या मित्रांनीच दिला दगा, अल्पवयीन मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य

संबंधित बातम्या

वर्षभरापूर्वी त्याने कोथरूड परिसरातून मोटार चोरली होती. त्याने पौड परिसरातून दुचाकी चोरली होती. चोरी करून मिश्रा मूळगावी गेला. त्याने नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली होती. मिश्रा याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली होती.

त्यानंतर मध्य प्रदेशातील मिश्रा याच्या मूळगावी पोलिसांचे पथक दाखल झाले. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना नातेवाईकांनी दिली. वृत्तपत्रातील मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

दरम्यान, पोलिसांच्या तपासात मिश्रा हयात असल्याची माहिती मिळाली. तो चोरी केलेली मोटार वापरत होता. मोटारीच्या वाहन पाटीवरील क्रमांक बदलून तो पुण्यात आला असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक माळी, दहिभाते, चौधर यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.  

हे ही वाचा :  pune koyata gang : कोयता गँगचा मोठा कट उधळला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

जाहिरात

अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक माळी, चौधर, सुळ, शिर्के, राठोड, वाल्मिकी, दहिभाते, शेळके आदींनी ही कारवाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या