आग्रा, 2 फेब्रुवारी : महिलांसाठी अनेक कायदे बनवूनही त्यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित वातावरण अजून तयार झालेलं नाही. आग्र्यामध्ये याचं एक उदाहरण नुकतंच समोर आलंय. 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून 7 जणांनी तिला देहविक्रीच्या व्यवसायात ओढलं; मात्र तिनं मोठ्या हिमतीनं यामधून बाहेर पडून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मित्रमैत्रिणी हक्काचे साथीदार असतात. त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो; मात्र काही वेळा हीच मैत्री उलटते. आग्र्याच्या एका 15 वर्षीय मुलीच्या बाबतीत हेच घडलं. नोकरीच्या आमिषापोटी तिनं मित्रावर विश्वास ठेवला आणि त्यानं तिचा विश्वासघात केला. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशात आग्र्यातल्या ताजगंज भागात एक किशोरवयीन मुलगी एका कारखान्यात काम करत होती. तिथेच काम करणाऱ्या समीर नावाच्या मुलाशी तिची मैत्री झाली. काही कामानिमित्त ती 26 तारखेला समीरच्या घरी त्याला भेटायला गेली होती. त्यानं खूपच आग्रह केला व चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं म्हणून ती त्या रात्री त्याच्या घरीच राहिली. दुसऱ्या दिवशी 27 तारखेला समीरनं तिची गाठ फरजाना आणि आसमां नावाच्या दोन महिलांशी घालून दिली. दोघींनी तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. रामनगर भागात त्यांच्या ओळखीच्या मीना नावाच्या एका परिचित महिलेकडे त्या तिला घेऊन गेल्या. त्यानंतर तिथून तिला टेढी बगिया भागातल्या एका घरात घेऊन गेल्या. तिथे तिला बंदी बनवण्यात आलं. यामीन नावाचा एक तरुण तिच्यावर नजर ठेवायचा. त्यानंतरचे 2-3 दिवस काही जणांनी बोली लावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला; मात्र त्यानंतर तिनं संधी साधून तिथून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं. 2 दिवसांपूर्वी पत्नीने संपवलं आयुष्य, पोलिसांनी चौकशीला बोलावलं तर पतीनेही स्टेशनमध्ये उचललं टोकाचं पाऊल पोलिसांनी तिची तक्रार ऐकून घेतली व त्यानुसार छापे टाकून काही जणांना पकडलं. समीर, फरजाना, आसमां आणि मीना यांच्यासह 7 जणांना पोलिसांनी पकडलं आहे. आणखी एका आरोपीचा तपास पोलीस करत आहेत. अनेक तरुण मुलींना नोकरीचं आमिष दाखवून स्वतःच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप मीनावर आहे. त्यासाठी ती जागा भाड्याने घेत होती व एजंटच्या मार्फत ग्राहक शोधत होती. त्यातून तिला भरपूर पैसाही मिळत होता. आईच्या प्रेमाने मृत्यूच्या जबड्यातुन लेकाला काढलं बाहेर; मोबाईलच्या रिंगने असं मिळालं जीवदान आतापर्यंत अशा अनेक तरुणींना देहविक्रीच्या व्यवसायात जबरदस्तीनं ओढलं गेलं असेल. मुलींची पैशांची गरज व असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक केली जाते. अनेक जणांची टोळी हे सगळं पद्धतशीरपणे करत असते; मात्र तरुणीच्या तक्रारीमुळे पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.