JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे पोलिसांचा अजब कारभार, गुंड मोकाट अन् कोयता बनवणाऱ्यांवरच कारवाई

पुणे पोलिसांचा अजब कारभार, गुंड मोकाट अन् कोयता बनवणाऱ्यांवरच कारवाई

पुण्यात मागच्या 15 दिवसांत कोयत्याने दहशत माजवण्याच्या सलग दोन घटना घडल्याने पुणे पोलीस हाडबडून जागे झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 जानेवारी : पुण्यात मागच्या 15 दिवसांत कोयत्याने दहशत माजवण्याच्या सलग दोन घटना घडल्याने पुणे पोलीस हाडबडून जागे झाले आहे. दरम्यान पुणे पोलिसांकडून चुकीची कारवाई होत असल्याची जोरदार चर्चा पुणे शहरात सुरू आहे. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यावर वचक ठेवण्याऐवजी पुणे पोलिसांकडून शेतीच्या कामासाठी कोयता बनवणाऱ्या कारागिरांवर कारवाई होत असल्याची माहिती समोर आली आहे. नारळ सोलण्याच्या कामासाठी कोयता बनवणाऱ्या कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. हे कोयते अल्पवयीन मुलांना विकत असल्याचे कारण सांगून त्यांची कोयते जप्त केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाली फाशी दिल्याचा प्रकार सुरू आहे. शहरातल्या अल्पवयीन मुले कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाना आवर घालता येत नसल्याने आता वर्षानुवर्षे इतर रोजच्या शेतीच्या नारळ सोलण्याच्या कामांसाठी लागणाऱ्या कोयत्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे.  

हे ही वाचा :  काका उठला पुतण्याच्या जीवावर, ऊसाच्या शेतात दिसला तेव्हा… पुण्यातील धक्कादायक घटना

संबंधित बातम्या

पोलिसांनी बोहरी आळीत कोयत्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून दीडशे कोयते जप्त केले आहेत. अल्पवयीन मुलांना कोयते विकत असल्याचा ठपका या विक्रेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता दाखवून दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातल्या मोबाईल मार्केटमध्ये चार जणांच्या टोळक्याने हातात कोयते फिरवत दहशत माजवली आहे. या घटनेमुळे स्थानिक दुकानदारांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

जाहिरात

पुण्याच्या मोबाईल मार्केट येथील तापकीर गल्लीमधून चार जण हातात कोयते घेऊन शिरले आणि स्थानिक दुकानदारांची दुकानं फोडली. या चार गुंडांनी कोयते फिरवत दहशत निर्माण केली आणि तापकीर गल्लीच्या उत्तर दिशेला पळत सुटले. या घटनेने मोबाईल मार्केटमध्ये भीतीचं वातावरण आहे.

याआधीही पुण्यात कॅम्पस परिसरात कोयता गँगने दहशत माजवली होती. निशा रेस्टॉरंट बाहेर कोयता गँगच्या पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयता आणि लाठ्याकाठ्याने तोडफोड केली. 28 डिसेंबरच्या रात्री पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. तसेच परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांवर कोयता चालवला.

जाहिरात

हे ही वाचा :  कोयता गँगला फोडून काढणाऱ्या पोलीस दादांना मिळालं खास गिफ्ट, सोशल मीडियावरही जलवा

पुणे पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हातात कोयता घेऊन पळत असलेल्या गुंडाला पकडलं. या गुंडांची नंतर कोयता चालवलेल्या रस्त्यावरूनच धिंड काढण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या