पुणे, 8 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. यातच आता पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे ‘काका मला मारू नका’ असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली. वागदरवाडी येथील काका-पुतण्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आईसुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाली आहे. याप्रकरणी शारदा नानासाहेब भुजबळ (वय 62 वर्षे, रा.वाघदरवाडी वाल्हा ता.पुरंदर जि.पुणे) सध्या रा. दत्तनगर कात्रज पुणे यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरुन जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर त्रिंबक भुजबळ (रा. वाघदरवाडी ता. पुरंदर जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात फिर्यादीचा मुलगा स्वप्नील नानसो भुजबऴ हादेखील जखमी झाला आहे. फिर्यादी महिलेने काय म्हटले - ही घटना काल 7 तारखेला दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादीचे धाकटे दिर भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी आम्हाला न विचारता उसाचे पिक घेवुन उस तोड सुरू केली. यावेळी उस तोडणीचे काम थांबविण्याकरीता मी आणि मुलगा स्वप्नील असे गेलो असता धाकटे दिर भास्कर त्रिंबक भुजबळ याने अगोदर कर्जाचे पैसे द्या असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी केली आणि माझे व मुलगा स्वप्नील याचे अंगावर एक लिटर मापाचे प्लाटीक कॅन्डमधील राँकेल टाकले. हेही वाचा - औरंगाबादेत बलात्काराचे सत्र सुरुच; दोन विवाहित महिलानंतर सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार तसेच हातातील लाकडी पेटत्या टेम्ब्याने आम्हाला पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून माझी धाकटे दिर भास्कर त्रिंबक भुजबळ यांचेविरूध्द तक्रार आहे, असे फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई गावडे हे करित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.