JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Crime News : तिने दारू मागितली अन् पोरांनी तिला विवस्त्र करून संपवलं, पुण्यात घडलं भयानक कांड

Pune Crime News : तिने दारू मागितली अन् पोरांनी तिला विवस्त्र करून संपवलं, पुण्यात घडलं भयानक कांड

पुण्यातील कोंढवा परिसरात खून करून मृतदेह फेकल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळ कोंढवा परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 04 जानेवारी : पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुण्याच्या सिंहगड परिसरात कोयत्याने धाक दाखवत दहशत माजवल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यातील घटनेची चर्चा रगंली आहे. दरम्यान पुण्यातील कोंढवा परिसरात खून करून मृतदेह फेकल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळ कोंढवा परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान कोंढवा पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे.

कोंढव्यातील मेयफेर इलिगंझा किसायटीच्या समोरील रिकाम्या प्लॉटमध्ये विवस्त्र अवस्थेत पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या खुनाचा छडा लावण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. त्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सैद आसिफ शेख (वय 20, रा.  शिवनेरीनगर, कोंढवा) याला अटक केली. तसेच त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन असल्याने त्यालाही ताब्यात घेतले आहे. या महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाही.

हे ही वाचा :  अंजलीला 4 किंवा 12 नाही, तर 40 किलोमीटर फरफटत नेलं; सीन रिक्रिएट करताच हादरवणारा खुलासा

संबंधित बातम्या

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेयफेर इलिगंझा सोसायटीच्या समोर असणार्‍या साई मंदिरालगतच्या रिकाम्या प्लॉटमध्ये बोरीच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटू नये, म्हणून चेहरा विद्रुप करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना शिवनेरीनगर येथील दोघा मुलांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील झाडीमध्ये पाईपवर बसून ते दोघे जण बिअर पित असताना ही महिला या दोघांजवळ आली. तिने दारू द्या, असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला.  

जाहिरात

हे ही वाचा :  आठवीतील मुलाला शिक्षक वर्गातच म्हणाले ‘गळफास घेऊन आत्महत्या कर..’; पुढे भयानक घडलं

त्याचा राग आल्याने या मुलांनी धक्का दिल्याने ती पडली. तेथे असलेल्या दगडाने त्यांनी तिला मारले. तिचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने ते पळून गेले होते. ही कारवाई गुन्हे शाखेचे युनिट 5 चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोगले व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या