जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अंजलीला 4 किंवा 12 नाही, तर 40 किलोमीटर फरफटत नेलं; सीन रिक्रिएट करताच हादरवणारा खुलासा

अंजलीला 4 किंवा 12 नाही, तर 40 किलोमीटर फरफटत नेलं; सीन रिक्रिएट करताच हादरवणारा खुलासा

अंजलीला 4 किंवा 12 नाही, तर 40 किलोमीटर फरफटत नेलं; सीन रिक्रिएट करताच हादरवणारा खुलासा

हा सीन रिक्रिएट केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. मृत तरुणीला 12 नाही तब्बल 40 किलोमीटर कारखाली फरफटत नेल्याचं समोर येत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 04 जानेवारी : बहुचर्चित कंझावला रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या अंजली सिंह प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक आणि हादरवणारा खुलासा झाला आहे. दिल्लीमधील मृत तरुणीला कारसोबत 12 किलोमीटर फरफट नेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हा सीन रिक्रिएट केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. मृत तरुणीला 12 नाही तब्बल 40 किलोमीटर कारखाली फरफटत नेल्याचं समोर येत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अगदी पहाटे दिल्लीमध्ये एक हादरवून सोडणारी घटना घडली होती. यात एका तरुणीला कारने कित्येक किलोमीटर फरफटत नेलं. कारमध्ये पाच जण होते. ही कार वेगवेगळ्या चार पोलीस ठाण्यांसमोरुन गेली पण कुणालाही पत्ता लागला नाही. घटनेमध्ये पीडित तरुणीचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आहे. Kanjhawala Accident: अंजली फुल नशेत गाडी चालवत होती, पण.. मैत्रीणीने सांगितली घटनेची आपबिती अपघातात मृत्यू झालेल्या अंजली सिंहचा ऑटोप्सी रिपोर्टही समोर आला असून, त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजली सिंहच्या ऑटोप्सी अहवालात असं नमूद केलं आहे की तिची कवटी पूर्णपणे फुटली होती, ब्रेन मॅटर गायब होते, पाठीचा कणा फ्रॅक्चर होता आणि तिच्या शरीरावर एकूण 40 जखमा होत्या. 20 वर्षीय अंजलीच्या या अहवालात अशा भयानक आणि गंभीर जखमांचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अंजलीसोबत ही घटना घडली, त्यावेळी तिची एक मैत्रीण निधीही तिच्यासोबत स्कूटीवर बसली होती. या धडकेत तिलाही दुखापत झाली. मात्र, अंजलीची मदत करायचं सोडून ती घरी निघऊन आली. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर तिने मीडियासमोरही आपली बाजू मांडली आणि अशा प्रकारे घरी निघून येण्याचे कारणही सांगितले. कवटी फुटलेली, ब्रेन मॅटर गायब, शरीरावर 40 जखमा आणि…; अंजलीच्या ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे या अपघाताची प्रत्यक्षदर्शी असलेल्या निधीने सांगितले की, “ती खूप मद्यधुंद अवस्थेत होती, मी तिला म्हटलं मी स्कूटी चालवते, पण तिने मला स्कूटी चालवायला दिली नाही. यावरून आमच्यात वादावादीही झाला होता”. निधी म्हणाली, ‘आमच्या गाडीला धडक बसली, त्यानंतर मी एका बाजूला पडले आणि ती गाडीखाली आली. त्यानंतर ती गाडीखाली कशात तरी अडकली. गाडी तिला फरफटत घेऊन गेली. मला भीती वाटत होती म्हणून मी तिथून निघून आले आणि कोणाला काही सांगितले नाही.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात