पुणे, 12 जानेवारी : हिवाळा सुरू झाला की दिल्ली आणि परिसरात हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरूवात होते. दरम्यान याबाबत आपण दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवा खराब झाल्याची माहिती ऐकली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून मुंबईचीही हवा खराब झाल्याची माहिती आपण वाचत आलो आहोत परंतु आता महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्याचेही हवामान खराब होत चालले आहे. मागच्या दोन महिन्यातील सर्वाधिक हवामान खराब असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता खराब (पूअर) होत गेली आहे. पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. शहरातील सफर संस्थेच्या बुधवार (दि. 11) च्या अहवालानुसार दिल्लीनंतर पुण्याची हवा सर्वाधिक प्रदूषित प्रकारात गणली गेली आहे. पुण्याने मुंबई, अहमदाबादलाही मागे टाकले असून, डिसेंबर-जानेवारीतील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात पहाटे 3 ते 5 या काळातच सध्या हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निष्पण्ण झाले आहे.
साधारणपणे उन्हाळा सुरू झाला की, हवेची गुणवत्ता खराब प्रकारात जाते, कारण वातावरणात आर्द्रता कमी झालेली असते. पाऊस नसतो, त्यामुळे धूलिकणांसह इतर सर्वच प्रकारचे प्रदूषक घटक वाढतात. मात्र, डिसेंबर-जानेवारीत हवेची आर्द्रता जास्त असूनही शहराच्या हवेची गुणवत्ता खराब आहे.
बुधवार, दि. 11 जानेवारी रोजी दिल्लीनंतर पुणे शहराची हवा सर्वाधिक प्रदूषित गटात गणली गेल्याचा अहवाल सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅन्ड वेदर फॉर कास्टिंग अँड रिसर्च (सफर ) या संस्थेने संकेतस्थळावर दिला आहे. धूलिकणांतून प्रदूषित होणार्या शहरांत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे ही चार शहरे देशात सर्वांत आघाडीवर आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असणारी सफर ही संस्था रोज या चारही शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करीत असते.
सफर संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास शिवाजीनगर, हडपसर, भोसरी, आळंदी रस्ता या भागांतील हवा सर्वाधिक प्रदूषित ठरली. या ठिकाणी अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) चे प्रमाण 300 मायक्रो ग्रॅम प्रती क्युबिक मीटरपेक्षाही जास्त होते.
राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे; थंडीची लाट आणखी तीव्र होणार, मुंबई, पुण्यात पारा घसरलासाधारणपणे पुणे शहरातील हवेची सरासरी गुणवत्ता 115 च्या जवळपास असते, ती साधारण प्रदूषित प्रकारात मोडते, पण गेल्या साठ दिवसांपासून शहरात सुरू असलेली वाहनांची वर्दळ, बांधकामांची धुळ व औद्यागिक प्रदूषण यांसह इतर कारणांनी हवेची गुणवत्ता खराब प्रकारात गेली आहे. शहरातील शिवाजीनगर व स्वागरेट हा भाग सतत अतिप्रदूषित प्रकारात आहे.