JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Petrol Pump Roberry : पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा; कामगारांना कोयत्याने मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Petrol Pump Roberry : पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा; कामगारांना कोयत्याने मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना अज्ञात पाच चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून चोरी केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना अज्ञात पाच चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून 22 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. ही घटना गुरुवारी (ता. 23) संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी योगेश विनायक हिंगे (वय - 37, रा. हिंगे वाटर, टापरेवाडी, ता. भोर जि. पुणे) यांनी अज्ञात 5 आरोपींविरोधात भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

हे ही वाचा :  भाजप आमदाराच्या गाडीचा फलटणजवळ भीषण अपघात, पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली फॉर्च्युनर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळू ग्रामपंचायत हद्दीत तुषार रामचंद्र जगताप यांच्या मालकीचा श्रीराम पेट्रोल पंप आहे. गुरुवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात इसम हे हातामध्ये दोन ते अडीच फूट लांबीचे धारदार कोयते घेऊन दोन कळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आले होते. त्यांनी सिक्युरिटी गार्ड भरत परिहार यास हाताला पकडून हिंगे काम करीत असलेल्या कार्यालयात आणून कॅश द्या कॅश द्या असे ओरडत व शिवीगाळ करत आरोपींनी हिंगे व आणखी तीन कामगारांना व सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली.

संबंधित बातम्या

जाहिरात

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पाच जण दोन दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी सुरक्षारक्षक भरत परिहार यांच्या हाताला पकडून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये आणले. त्यानंतर तेथील कॅश द्या, असे ओरडत शिवीगाळ केली. त्यांनी 21,800 रुपये रक्कम लुटत कोयत्याने सुरक्षारक्षक व इतर तीन कामगारांना गंभीर जखमी केले.

जाहिरात

हे ही वाचा :  मोठी दुर्घटना! सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन 40 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

त्यानंतर त्यांनी पुण्याच्या दिशेने पलायन केले. या घटनेच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व संजय सुतनासे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके रवाना झाली आहेत. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी तपास करीत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या