तिरुअनंतपुरम 24 डिसेंबर : केरळ-तामिळनाडू सीमेजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक वेदनादायक दुर्घटना घडली. येथील कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन उलटून आठ यात्रेकरू ठार झाले. या अपघातात अन्य दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. सर्व यात्रेकरू मूळचे थेनी-अँडीपेट्टीचे रहिवासी होते आणि ते शबरीमालाला भेट देऊन परतत होते. भाजप आमदाराच्या गाडीचा फलटणजवळ भीषण अपघात, पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली फॉर्च्युनर पोलिसांनी सांगितलं की, हे सर्व शबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात भगवान अय्यप्पाचे दर्शन घेऊन परतत होते. कुमिली-कुंबम मार्गावर तामिळनाडूला पाणी वाहून नेणाऱ्या पहिल्या पेनस्टॉक पाईपजवळ ही घटना घडली. व्हॅन रस्त्यापासून सुमारे 40 फूट खाली खड्ड्यात पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅन सुसाट वेगाने जात होती. सबरीमाला यात्रेचा हंगाम शिखरावर आहे, दिवसाला सुमारे 1 लाख यात्रेकरू डोंगरमाथ्याला भेट देतात. केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी या दुर्घटनेत आपले जवळचे आणि प्रियजन गमावलेल्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; ब्लास्टिंगमध्ये 2 जणांचा मृत्यू, 7 जखमी मुरलीधरन यांनी ट्विट केलं की, ‘इडुक्की येथे झालेल्या अपघातात सबरीमाला यात्रेकरूंच्या निधनाने खूप दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांसाठी मनापासून संवेदना. मी जखमींच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.