JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर आलेच पाहिजे, फडणवीसांचा मागणी

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर आलेच पाहिजे, फडणवीसांचा मागणी

परळी इथं राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीने पुण्यातील हडपसरमधील सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 फेब्रुवारी : पुण्यातील (Pune) हडपसरमध्ये एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाजपने (BJP) पोलीस पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणात विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही ‘या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील परळी इथं राहणारी 22 वर्षीय तरुणी पुण्यात शिकण्यासाठी आली होती. पुण्यातील हडपसरमधील  महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ती तिच्या भावासोबत राहत होती. रविवारी 7 फेब्रुवारी 2021 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास तरुणीने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात ती गंभीर जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिचा मृत्यू झाला. राज्यपालांना विमान नाकारल्यामुळे फडणवीसांचा भडकले, ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले. विदर्भातील एका मंत्र्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते, अशी माहितीही समोर आली. परंतु, आत्महत्येपूर्वी तरुणी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती, कुणाबद्दल कोणताही मेसेज तिने लिहून ठेवला नव्हता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी सात दिवसांनी  भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली,  या बाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांना निवेदन  देण्यात आले आहे. राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर आर्थिक संकट, पैसे काढण्यावर RBIचे निर्बंध ‘या  प्रकरणात महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यासाठी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्या कठोर शासन करावे’, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांनी वानवडी पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर शहर भर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  ‘याबाबत तात्काळ पुणे पोलिसांनी कारवाई करून तथ्य बाहेर काढले पाहिजे. या घटनेत सत्यबाहेर आलेच पाहिजे ते लपवण्याचे कोणतेही कारण नाही’, अशी प्रतिक्रिया दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या