जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आर्थिक संकट, या सहकारी बँकेतून पैसे काढण्यावर RBI चे निर्बंध

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आर्थिक संकट, या सहकारी बँकेतून पैसे काढण्यावर RBI चे निर्बंध

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आर्थिक संकट, या सहकारी बँकेतून पैसे काढण्यावर RBI चे निर्बंध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नाशिक स्थित इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Independence Co-operative Bank) मधून पैसे काढण्यास निर्बंध आणले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 11 फेब्रुवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नाशिक स्थित इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Independence Co-operative Bank) मधून पैसे काढण्यास निर्बंध आणले आहेत. आरबीआयने बुधवारी याबाबत एक निवेदन सादर केले. या निवेदनात आरबीआयने असे नमुद केले आहे की, बँकेचे 99.88 टक्के ठेवीदार पूर्णपणे डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation)च्या विम्याअंतर्गत येत आहेत. सहा महिन्यांसाठी निर्बंध बँकेतून पैसे काढण्यासाठी हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत. आरबीआयने असे म्हटले आहे की, ‘बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खात्यातून किंवा अन्य कोणत्याही खात्यातून जमा असणारी रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ग्राहक जमा रकमेतून कर्जाची परतफेट काही अटीनुसार करू शकतात.’ (हे वाचा- चहा प्या आणि कपही खाऊन टाका, कोल्हापूरात इंजिनिअर त्रिकुटाची भन्नाट शक्कल ) आरबीआयने बुधवारी कामकाजाची वेळ संपल्यानंतर आणखीही काही निर्बंध लादले आहेत. याअंतर्गंत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकत नाहीत किंवा रिन्यू करू शकत नाहीत. कोणतीही गुंतवणूक किंवा पेमेंट देखील करता येणार नाही. बँकिंग व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहील आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँक या निर्बंधासह त्यांचे बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. ही परिस्थिती आर्थिक परिस्थितीत सुधार होईपर्यंत राहील. केंद्रीय बँक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये सुधारणा करेल. (हे वाचा- चहा प्या आणि कपही खाऊन टाका, कोल्हापूरात इंजिनिअर त्रिकुटाची भन्नाट शक्कल ) डीआयसीजीसी काय आहे? कोणतीही बँक बंद झाल्यास त्यावेळी बँकेच्या सर्व ठेवीदारांना भांडवल परत देण्याची तरतूद आहे. डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून हे सुनिश्चित करण्यात आले आहे.  डीआयसीजीसीच्या नियमांनुसार ही मर्यादा केवळ 5 लाखांपर्यंत आहे. याचा अर्थ असा की बँक बंद झाल्यानंतर ठेवीदारांना जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत मिळू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात