JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली', प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

'शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली', प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं? असा थेट सवाल यावेळी प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

जाहिरात

praveen darekar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 सप्टेंबर : राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अशात मुंबईत मात्र पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईची आजची परिस्थिती पाहता विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेनेनं करून दाखवलं अशी उपरोधिक टीका भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. शिवसेनेनं करून दाखवलं मुंबईची तुंबई केली. वरवर काम करतात त्यामुळे मूळ मुद्द्याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की, पावसाळा गेल्यानंतर 7 ते 8 महिने राहतात काम करण्यासाठी तरीदेखील काही काम करत नाहीत. 30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं? असा थेट सवाल यावेळी प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. सरकारनं काल जे मराठ्यांना आता आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलती दिल्या आहेत त्यावर समाधानी नाही. मराठा समाजाला चांगलं पॅकेज द्यायला हवं होतं. जो उद्रेक होतोय ते थांबवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. पण मराठा समाजाला सरकारकडून मलमपट्टी लावायचं काम केलं जातं असल्याची जहरी टीका दरेकरांनी केली. भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात प्रवीण दरेकर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - एकनाथ खडसे जेष्ठ नेते आहेत. त्यांना सन्मान देण्यासाठी केंद्रीय कमिटी आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं उचित नाही. - शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस जाणं ही एक रुटीन प्रक्रिया असावी. त्यात विरोधी पक्षाला उगीच त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजिबात हेतू नाही. ऊसतोड कामगार - सरकार कारखान्याना, शेतकऱ्यांना मदत करतं. तसं ऊसतोड कामगारांनाही मदत केली पाहिजे. सरकारने जर हे नाही केले तर विरोधीपक्ष नेते म्हणून त्यावर जाब विचारू. - नाबार्डच्या महाव्यवस्थापकाची भेट घेतली. काल गृहनिर्माण संस्थाच्या स्वयं पुनर्विकास प्रकरणांना अर्थ पुरवठा करण्यासाठी नाबार्डने ने जी निर्बध घातली आहेत. ती बंधने उठविण्यासंदर्भात भेट घेतली. खासगी रुग्णालयात पाठवलेल्या 48 कोरोना बाधितांचा मृत्यू, तातडीने चौकशीचे आदेश - १६०० प्रस्ताव पुनर्विकासाचे आले आहेत आणि नाबार्डने त्यावर बंधन घातलं. यात कुठलेही कोणाचे लागेबांधे नाहीत. या योजनेची अनेक ठिकाणी विचारणा झाली. आज नाबार्डला त्याविषयी माहिती दिली. भाजप-शिवसेना सरकार काळात त्याला सरकारी योजना नाव मिळालं. - नाबार्ड चांगली बैठक झाली. मुबईकराचा चांगला विषय मार्गी लागेल. - कंगनाच्या चौकशीला आमची काहीच हरकत नाही. - कंगना ड्रगिस्ट राहिली असेल तर तिची देखील चौकशी व्हावी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या