JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रतीक्षा संपली! अयोध्येतील भव्य राम मंदिरात 'या' दिवशी विराजमान होणार रामलल्ला

प्रतीक्षा संपली! अयोध्येतील भव्य राम मंदिरात 'या' दिवशी विराजमान होणार रामलल्ला

देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाईल. त्यानंतर 24 जानेवारी 2024 पासून जगभरातील रामभक्तांना मंदिरात दर्शन घेता येईल.

जाहिरात

देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाईल. त्यानंतर जगभरातील रामभक्तांना भव्य मंदिरात दर्शन घेता येईल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 22 जून : रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या क्षणाची तारीख जाहीर झाली आहे. बहुप्रतीक्षित राममंदिरात रामलल्ला 22 जानेवारी 2024 रोजी विराजमान होणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रभू रामाच्या राज्याभिषेकाच्या आठवडाभरापूर्वी देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजेच मकर संक्रांतीपासूनच संपूर्ण देशात या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वैदिक विद्वान या महोत्सवात पूजा करतील. 22 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्ला यांना भव्य मंदिरात विराजमान करतील आणि 23 जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा समारोप होईल. त्यादरम्यान देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाईल. त्यानंतर 24 जानेवारी 2024 पासून जगभरातील रामभक्तांना भव्य मंदिरात आपल्या दर्शन घेता येणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्याचा लयभारी कारभार! अधिकाऱ्यांनाच भरायला लावलं पाणी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर रामभक्तांचं स्वप्न साकार होत आहे. त्यामुळे भाविकांना ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अयोध्येत रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र ट्रस्ट प्रवाशांसाठी व्हीलचेअरपासून बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या