उत्तर प्रदेशात शरयू नदीच्या (Sharayu River) काठावर वसलेली अयोध्या (Ayodhya) ही श्रीरामांची जन्मभूमी आणि हिंदू धर्मीयांसाठी तीर्थस्थान आहे. गेली अनेक वर्षं अयोध्या आणि तिथलं राम मंदिर (Ram Mandir) हा वादाचा आणि राजकारणाचा मुद्दा बनला आहे. उत्तर प्रदेशातल्या अयोध्या शहरातली ही जागा राम जन्मभूमी आहे अशी हिंदूंची धारणा आहे. याच जागेवर बाबरी मशीद होती. मूळ मंदिर तोडून इथं मशीद उभारण्यात आली का, याबद्दल अनेक वर्षं वाद सुरू आहे. 16व्या शतकात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मशीद उभारली असं हिंदू मानतात. आपणही अनेक वर्षांपासून तिथे प्रार्थना करत असल्याचं मुस्लिम मानतात. चार