जाहिरात
मराठी बातम्या / देश / जिल्हा दंडाधिकाऱ्याचा लयभारी कारभार! अधिकाऱ्यांनाच भरायला लावलं पाणी

जिल्हा दंडाधिकाऱ्याचा लयभारी कारभार! अधिकाऱ्यांनाच भरायला लावलं पाणी

दंडाधिकाऱ्यांनी पंचायतीतील शाळा, शौचालये, आरोग्य केंद्र, पाण्याचे नळ इत्यादींची पाहणी केली.

दंडाधिकाऱ्यांनी पंचायतीतील शाळा, शौचालये, आरोग्य केंद्र, पाण्याचे नळ इत्यादींची पाहणी केली.

गावकऱ्यांना योजनांचा योग्य लाभ मिळतोय का? हे ते स्वतः त्यांच्याकडूनच जाणून घेतात. त्यामुळेच कार्यकर्ता असावा तर असा, अशा भावना तेथील गावकरी व्यक्त करतात.

  • -MIN READ Local18 Munger,Bihar
  • Last Updated :

सिद्धांत राज, प्रतिनिधी मुंगेर, 22 जून : बिहारच्या मुंगेर जिल्ह्याचे दंडाधिकारी नवीन कुमार हे आपल्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतात. गावकऱ्यांना पाणी मिळत नाही म्हणून पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच भांड्यातून पाणी भरायला लावल्याने सध्या सर्वत्र त्यांची चर्चा आहे. कार्यकर्ता असावा तर असा, अशा भावना तेथील गावकरी व्यक्त करतात. पंचायतीत सुरू असलेल्या विकासकामांच्या तपासणीसाठी नवीन कुमार प्रत्येक गावात जाऊन तेथील गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधतात. गावकऱ्यांना योजनांचा योग्य लाभ मिळतोय का? हे ते स्वतः त्यांच्याकडूनच जाणून घेतात. त्यामुळे गावकऱ्यांना कायमच ते आपल्यातील एक वाटतात.

News18लोकमत
News18लोकमत

जिल्हादंडाधिकारी अलीकडेच जिह्याच्या हवेली भागातील नाकी पंचायतीत पाहणीसाठी गेले होते. तेथील एका गावात ते थेट एका घरातील खाटेवरच जाऊन बसले. पाहता पाहता सर्व गावकरी त्यांच्याभोवती गोळा झाले. गावकऱ्यांनी एकामागोमाग एक तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. या सर्व तक्रारी नवीन यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्यानुसार ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना फटकारलं. शिवाय सर्व गावकऱ्यांना पाणी मिळत नाही हे ऐकताच नळपाणी योजनेत निष्काळजीपणाच्या तक्रारीवरून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आणि तिथेच भांड्याने पाणी भरून बादल्या भरायला लावल्या. हे पाहून गावकरीही आश्चर्यचकीत झाले. Cooking Tips Marathi : तुमच्या चपात्या फुलत नाहीत का? मग वापरा या सोप्या टिप्स आणि बनवा मऊ लुसलुशीत चपात्या दरम्यान, दंडाधिकाऱ्यांनी पंचायतीतील शाळा, शौचालये, आरोग्य केंद्र, पाण्याचे नळ इत्यादींची पाहणी केली. शिवाय घरातील सामान, वृद्ध व्यक्तींना पेन्शन इत्यादींबाबत महिलांशीही त्यांनी संवाद साधला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात