JOIN US
मराठी बातम्या / देश / कर्नाटक विजयानंतर काँग्रेस अ‍ॅक्टिव मोडवर; विधानसभा निवडणुकांचा प्लॅन आला समोर, भाजपचं टेन्शन वाढलं!

कर्नाटक विजयानंतर काँग्रेस अ‍ॅक्टिव मोडवर; विधानसभा निवडणुकांचा प्लॅन आला समोर, भाजपचं टेन्शन वाढलं!

कर्नाटक विजयानंतर आता काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

जाहिरात

काँग्रेसकडून निवडणुकांच्या तयारीला सुरुवात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 23 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारत काँग्रेसनं मोठ्या विजयाची नोंद केली आहे. कर्नाटक विजयानंतर आता काँग्रेसकडून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. या राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसकडून खास रणनिती बनवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या राज्यातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा होणार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसकडून निवडणुकांची तयारी   कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. कर्नाटकमध्ये भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते कामाला लागल्याचं पहायला मिळत आहे. येत्या काळात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगण  या राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या राज्यातील प्रमुख नेत्यांची बुधवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यात आहे.

विरोधकांकडून लोकसभेची तयारी   दरम्यान दुसरीकडे  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एक मजबूत पर्याय देण्यासाठी सर्व विरोधक एकवटण्याची शक्यता आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी महराष्ट्रात येऊन शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. तर त्यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या