अशी असणार CM शिंदेंची नवी टीम?

अखेर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाला आहे. पुढील आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे.

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

 यामध्ये  शिंदे गटाचे नेते भरत गोगवले यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे, त्यांना जलसंधारण खातं मिळण्याची शक्यत आहे.

 संजय शिरसाट यांची परिवहन किंवा समाजिक न्याय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 प्रताप सरनाईक यांना गृहनिर्माण मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.

बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग विकास मंत्रालयाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. 

 याशिवाय सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांनाही मंत्रिपद मिळू शकते.

आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. 

गेल्या आठवड्यात निकाल आल्यानं मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.