राज ठाकरे, भाजपात पुन्हा दुरावा?
मनसे प्रमुख राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटासोबत मुंबई महापालिका निवडणुकीत युती करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.
या भेटीनंतर युतीच्या चर्चेला आणखी उधाण आलं, भाजप नेत्यांकडून राज ठाकरे यांचं कौतुक देखील सुरू होतं.
मात्र कर्नाटक निकालावरून राज ठाकरे यांनी भाजपला सुनावलं तर राहुल गांधी यांचं कौतुक केलं.
त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावरून देखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून राज ठाकरे यांना इशारा देण्यात आला आहे.
राज ठाकरे हे जर आमच्या सर्वोच्च नेतृत्त्वावर बोलत असतील तर ते सहन केलं जाणार नसल्याचं शेलार यांनी म्हटलं
सध्या सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप पाहाता मनसे आणि भाजपमध्ये पुन्हा दुरावा होत आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.