Home » Tag » Assembly Election
Assembly Election

Assembly Election News - विधानसभा निवडणूक बातम्या

    गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांकडे (Assembly Election 2022) संपूर्ण देशाचं लक्ष आहे. 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली आणि 10 मार्चला निकाल (Election Results) आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागा, उत्तराखंडच्या 70 जागा, गोवा विधानसभेच्या 40 जागा, पंजाब विधानसभेच्या 117 जादा आणि मणिपूरच्या 60 जागांसाठी मतदारांनी आपला कौल दिला.

    Exit Polls च्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात भाजप सत्ता टिकवून ठेवणार पण जागांची संख्या घटणार, पंजाबात सत्तापालट होऊन आम आदमी पार्टीला बहुमत मिळणार तर उत्तराखंड आणि गोव्यास कुठल्याच पक्षाला स्पष्ट कौल न मिळण्याचा अंदाज आहे. मणिपूरमध्येही कुठल्याच एका पक्षाची सत्ता येणं कठीण आहे. आता प्रत्यक्ष निकालानंतर चित्र स्पष्ट होईल.