JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिसवर गर्दी; वर्षभरात यशराजचे 5 सिनेमे होणार रिलीज

लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिसवर गर्दी; वर्षभरात यशराजचे 5 सिनेमे होणार रिलीज

लोकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी यशराज फिल्म्सने तयारी सुरु केली असुन त्यांच्या आगामी चित्रपटांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

जाहिरात

Yash raj films

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी: कोरोनामुळे चित्रपटसृष्टीला मोठया आर्थिक नुकसानाला सामोरे जावं लागलं आहे. अजूनही काही प्रोडक्शन हाउस आणि कंपनी त्यांची आर्थिक गणित जुळवण्यात व्यस्त आहेत. अशातच यशराज फिल्म्सने मात्र त्यांच्या यावर्षीच्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांची घोषणा केली आहे. यश राज फिल्म्स ही भारतातील सर्वात मोठी फिल्म निर्मिती आणि वितरण कंपन्यांपैकी एक आहे. यश चोप्रा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. भारतातले बिग बजेट चित्रपट बहुतेक वेळी यशराज बॅनरखालीच बनतात. आणि आता लॉकडाऊन मध्ये चित्रपटगृहांपासून दुरावलेल्या प्रेक्षकांना परत आणण्याच्या उद्देशाने यश राजकडून त्यांच्या आगामी 5 चित्रपटांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. अवश्य वाचा -   KGF स्टार यशच्या चाहत्यानं केली आत्महत्या; सुसाईड नोट पाहून अभिनेत्यालाही कोसळलं रडू

एक नजर टाकूया यशराजच्या येणाऱ्या सिनेमांवर आणि त्यातील कलाकारांवर: 1) संदीप और पिंकी फरार प्रदर्शनाची तारीख: शुक्रवार, 19 मार्च, 2021 कलाकार: अर्जुन कपूर, परिणीति चोपड़ा 2) बंटी और बबली 2 प्रदर्शनाची तारीख: शुक्रवार, 23 एप्रिल, 2021 कलाकार: सैफ अली खान, रानी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी (डेब्यू) 3) शमशेरा प्रदर्शनाची तारीख: शुक्रवार, 25 जून, 2021 कलाकार: रणबीर कपूर, वाणी कपूर,संजय दत्त 4) जयेशभाई जोरदार प्रदर्शनाची तारीख: शुक्रवार, 27 ऑगस्ट, 2021 कलाकार: रणवीर सिंह, शालिनी पांडे, बोमन ईरानी, रत्ना पाठक शाह 5) पृथ्वीराज प्रदर्शनाची तारीख: शुक्रवार, 5 नोव्हेंबर, 2021 (दिवाली)

कलाकार: अक्षय कुमार, मानुषी छिल्लर (डेब्यू), संजय दत्त, सोनू सूद हे वाचा -  ‘जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं’; रिंकूनं दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

संबंधित बातम्या

सैफ अली खानचा बंटी और बबली 2, अक्षय कुमारचा पृथ्वीराज या चित्रपटांबद्दल लोकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. आता यशराजची ही नवी प्रोमोशनल खेळी किती यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या