जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KGF स्टार यशच्या चाहत्यानं केली आत्महत्या; सुसाईड नोट पाहून अभिनेत्यालाही कोसळलं रडू

KGF स्टार यशच्या चाहत्यानं केली आत्महत्या; सुसाईड नोट पाहून अभिनेत्यालाही कोसळलं रडू

KGF स्टार यशच्या चाहत्यानं केली आत्महत्या; सुसाईड नोट पाहून अभिनेत्यालाही कोसळलं रडू

अभिनेता यशच्या एका चाहत्यानं आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती एक चक्रावून टाकणारी सुसाईट नोट लागली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई**,** 19 फेब्रुवारी: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता यशच्या एका चाहत्यानं आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बंगळुरु येथील मांड्या जिल्ह्यातील कोदीदोड्डी या गावात घडली. त्यानं आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती एक चक्रावून टाकणारी सुसाईट नोट लागली. आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव रामकृष्ण असं आहे. हा तरुण आपल्या स्वप्नांना पुर्ण करु शकला नाही. त्याला आपल्या कुटुंबासाठी काही तरी करायचं होतं परंतु आर्थिक टंचाईमुळं त्याला अपयश आलं. परिणामी त्याची प्रेयसी देखील त्याला सोडून गेली. या घटनांमुळं तो नैराश्येत गेला. अन् त्यानं आत्महत्या केली. रामकृष्णने लिहिलेल्या या अंतिम पत्रात आपल्या मानसिक स्थितीचा उल्लेख केला. या पत्रात त्यानं आणखी एक चक्रावून टाकणारी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या अंतिम यात्रेत अभिनेता यश आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी सहभागी व्हावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली. त्याची ही सुसाईड नोट सोशल मीडियावर चर्चेत आहे. अवश्य पाहा - ‘जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं’; रिंकूनं दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

जाहिरात

यशनं देखील आपल्या चाहत्याची इच्छा पुर्ण केली. “आम्ही कलाकार तुमच्या प्रेमामुळंच मोठे होतो. जर तुम्ही नसाल तर आमची काहीच किंमत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन यशनं आपल्या या चाहत्याला श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय त्यानं आत्महत्येचं पाऊल न उचलण्याची विनंती देखील आपल्या चाहत्यांना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात