मुंबई, 19 फेब्रुवारी: ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (chhatrapati sambhaji maharaj jayanti) देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सर्वसामान्य लोकांपासून नामांकित सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या लाडक्या राजांना सोशल मीडियाद्वारे मानवंदना वाहिली आहे. त्यांचे विचार, त्यांची तत्व, त्यांची महत्वकांक्षा याची सर्वत्र स्तुती केली जात आहे. दरम्यान अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिने देखील आपल्या अनोख्या शैलीत महाराजांना वंदन केलं. “जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं आहे.” अशी पोस्ट रिंकूनं केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता.” अशा शब्दात तिनं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिनं देशवासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अवश्य पाहा - सूर्यकांत मांढरे ते अमोल कोल्हे; पाहा रुपेरी पडद्यावर शिवराय साकारणारे अभिनेता ‘जाणत्या राजा’चा अमेरिकेतही जयजयकार… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गडकिल्ल्यांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र हा शिवजन्मोत्सव सोहळा केवळ राज्य किंवा देशापुरता मर्यादित राहिला नसून जगभरातील भारतीय मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना दिसत आहेत. महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील वकिलातीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.