JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शर्मिला टागोर नातवापासून दूर; का नाही पाहिला करीनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा?

शर्मिला टागोर नातवापासून दूर; का नाही पाहिला करीनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा?

करीनाच्या दुसऱ्या बाळाचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. परंतु या बाळाचा चेहरा त्याच्या आजीनं मात्र अद्याप पाहिलेला नाही. कारण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) हिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला. करीना आणि सैफ (Saif Ali Khan) यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. दरम्यान नुकतीच करीनाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सैफ अली खान आपला मोठा मुलगा तैमुरसोबत (Taimur) करीनाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. परंतु या बाळाचा चेहरा त्याच्या आजीनं मात्र अद्याप पाहिलेला नाही. स्पॉटबॉयनं दिलेल्या वृत्तानुसार सैफनं शर्मिला टागोर यांना फोनच्या माध्यमातून त्या दुसऱ्यांदा आजी झाल्याची बातमी दिली. ही बातमी ऐकून त्या प्रचंड खुश झाल्या. मात्र तरी देखील अद्याप त्यांनी या बाळाचा चेहरा पाहिलेला नाही. सध्या त्या दिल्लीत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं त्यांना दिल्लीतून मुंबईत प्रवास करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या नातवाची अद्याप भेट घेतलेली नाही. अवश्य पाहा - रुग्णालयातून घरी पोहोचताच करीनाची पहिली पोस्ट; चाहत्यांना म्हणाली… लॉकडाऊनमध्ये करीना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करीना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करीनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करीनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करीनाना प्रेग्नेंट होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या