मुंबई 23 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव भूत पोलीस असं आहे. हा एक हॉरर विनोदीपट आहे. लक्षवेधी बाब म्हणजे रुग्णालयातून घरी परतताच अभिनेत्री करीना कपूरनं पोस्टर शेअर केलं. अन् हा चित्रपट सिनेमागृहात येऊन पाहण्याची विनंती केली. भूत पोलीस या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर, अभिनेत्री यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस झळकणार आहेत. अलिकडेच या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं. हे चर्चेत असलेलं पोस्टर करीनानं देखील शेअर केलं आहे. “किंचाळण्यासाठी आणि हसण्यासाठी तयार रहा” असं म्हणत हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही सिनेमागृहात या अशी विनंती तिनं प्रेक्षकांना केली आहे.
देसी गर्लचा धक्कादायक खुलासा; त्या व्हिडीओमुळं मिळाल्या बलात्काराच्या धमक्या बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) हिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला. करीना आणि सैफ (Saif Ali Khan) यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. दरम्यान नुकतीच करीनाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सैफ अली खान आपला मोठा मुलगा तैमुरसोबत (Taimur) करीनाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये करीना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करीना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करीनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करीनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करीनाना प्रेग्नेंट होती.