JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पाकिस्तानी रॅपर आलियावर फिदा; समाज माध्यमांवर 'तो' VIDEO होतोय व्हायरल

पाकिस्तानी रॅपर आलियावर फिदा; समाज माध्यमांवर 'तो' VIDEO होतोय व्हायरल

एका पाकिस्तानी रॅपरने (Pakistani rapper) आलियावर एक रॅप बनवला आहे. रॅप पाहून आलियालाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 एप्रिल : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) भारतात जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती जगभरातही प्रसिद्ध आहे. अगदी कमी काळात तिने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं आहे. त्यामुळे जगभरात तिचे चाहते आहे. शेजारील देश पाकिस्तानातही (Pakistan) तिचे अनेक चाहते आहेत. एका पाकिस्तानी रॅपरने (Pakistani rapper) आता तिच्यावर एक रॅप बनवला आहे. आणि काही वेळातच तो रॅप सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. अनेकांनी आलियाला व्हिडीओत टॅग करायला सुरुवात केली आणि तो ऱॅप आलियाने देखिल पाहिला. पाकिस्तानी रॅपर मोहम्मद शहा याने हा आलिया हा रॅप बनवला असून तो आलियाचा चाहता आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने हा रॅप व्हिडीओ पोस्ट केला होता.

हे वाचा - खूपच सुंदर आहे ही MS धोनीची Ex-Girlfriend, लवकरच अडकणार विवाहबंधनात

या व्हिडीओत सुरूवातीला त्याचा मित्र त्याला म्हणतो की, ‘आलियावर गाणं बनव’, त्यानंतर मोहम्मद आलियावर रॅप गातो. रॅपच्या शेवटी त्याचा मित्र त्याला सांगतो की ‘आलियाचा बॉयफ्रेंड आहे, आणि त्याने जान्हवी कपूरवर (Janhvi Kapoor)  गाणं बनवायला ट्राय करायला पाहिजे.’ तेव्हा आता जान्हवी कपूरवरही रॅप येणार का हे पाहणं रंजक ठरेल.

संबंधित बातम्या

व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर आलियाच्या अनेक चाहत्यांनी तिला या पोस्टमध्ये टॅग करायला सुरूवात केली त्यामुळे हा व्हिडीओ तिच्यापर्यत देखिल पोहोचला आणि तिने या पोस्टवर कमेंट देखिल केली. गली बॉय या तिच्या सुपरहीट चित्रपटातील डायलॉग बोलत तिने ‘बहुत हार्ड’ अशी कमेंट केली. यावर त्या रॅपरने आलियाला ‘आय लव्ह यू’ असं म्हणत रिप्लाय दिला. आलिया सध्या तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत मालदीव मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. लवकरच ती ब्रम्हास्त्र, आरआरआर (RRR) , गंगुबाई काठियावाडी (Gnagubai kathiawadi) या चित्रपटांत ती दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या