मराठी बातम्या / बातम्या / करिअर / Google Apprenticeship Program: गुगलमध्ये 'या' क्षेत्रातील ग्रॅज्युएट्ससाठी जॉबची मोठी संधी; बघा संपूर्ण डिटेल्स

Google Apprenticeship Program: गुगलमध्ये 'या' क्षेत्रातील ग्रॅज्युएट्ससाठी जॉबची मोठी संधी; बघा संपूर्ण डिटेल्स

google Apprenticeship Program

या क्षेत्रांत रस असेल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. या अ‍ॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज करण्यासाठी पुढील दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे.


मुंबई, 28 ऑक्टोबर: अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक लहानमोठ्या आयटी कंपन्यांसह 'टेक जायंट' गुगलनंही अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. आतापर्यंत गुगलमधील हजारो कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. कर्मचारी संख्येमध्ये कपात केल्यानंतर गुगल आता अनेक व्हर्टिकल्समध्ये अ‍ॅप्रेंटिसशीप प्रोग्रॅम देऊ करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला डेटा अ‍ॅनॅलिटिक्स, सॉफ्टवेअर आणि टेक, डिजिटल मार्केटिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रांत रस असेल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. या अ‍ॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज करण्यासाठी पुढील दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे. प्रत्यक्ष प्रोग्रॅमला जुलै 2023 मध्ये सुरुवात होईल. 'टेक गिग'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

1. डिजिटल मार्केटिंग अ‍ॅप्रेंटिसशीप

किमान पात्रता:

- बॅचलर डिग्री किंवा समतुल्य प्रॅक्टिकल अनुभव.

- डिजिटल मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कामाचा जास्तीत जास्त एका वर्षाचा अनुभव.

- गुगल वर्कस्पेस (उदा. जीमेल, क्रोम, डॉक्स, शीट्स, इ.) किंवा त्यासारखी अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्याचा अनुभव गरजेचा.

- अस्खलित इंग्रजी बोलण्याची आणि लिहिण्याची क्षमता.

Career Tips: ऑफिसमध्ये कामाचा ताण येतोय? टेन्शन घेऊच नका; 'या' उपायांनी राहा बिनधास्त

कामाविषयी

गुगल डिजिटल मार्केटिंग अ‍ॅप्रेंटिसशीप हा 24 महिन्यांचा लर्निंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅमसाठी प्रशिक्षणार्थींनी त्यांना नियुक्त केलेल्या कार्यालयात वैयक्तिकरित्या हजर होणं आणि संपूर्ण प्रोग्रॅममध्ये पूर्णवेळ (आठवड्यातील 40 तास) सहभागी होणं अपेक्षित आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांना सक्षम करण्यासाठी इन-क्लासरूम लर्निंगद्वारे गुगल टीमसोबत कामाचा अनुभव या अ‍ॅप्रेंटिसशीप दिला जाईल.

जबाबदाऱ्या

- मूलभूत मार्केटिंग प्रिन्सिपल्स आणि सर्च मार्केटिंगशी संबंधित ज्ञान विकसित करणं आणि रिसर्च व वेब विश्लेषणाद्वारे पुढील कौशल्यं विकसित करण्याची संधी मिळवणं.

- डेव्हलपिंग करत असताना आणि लीडर्सकडून शिकत असताना रिअल टाईम समस्या सोडवण्यासाठी गुगलच्या टीमसोबत काम करण्याची तयारी आवश्यक.

- युजर्सना चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी इनसाईट जमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं (उदा. फोकस ग्रुप, हायपोथेसिस डेव्हलप/टेस्ट करण्यासाठी संशोधन एजन्सीसह काम करणे इ.).

- अकाउंट को-ऑर्डिनेटर आणि फॅसिलीटेटर म्हणून कसं काम करायचं ते शिकणं. क्लायंट कॅम्पेनची अंमलबजावणी आणि अनेक क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सपोर्टचं निराकरण करण्यास मदत करणं, प्रॉडक्ट आणि पार्टनशीप सोल्युशन्स चालवण्यासाठी टीमसोबत काम करणं.

- कम्युनिकेशन, क्लायंट आणि रिलेशनशीप मॅनेजमेंट स्कील्स विकसित करणं. क्लायंट आणि लीडर्सना कसं प्रभावित करायचं ते शिकणं.

अशी हवी कंपनी! 'या' कंपनीत चेहरा बघून नव्हे तर टॅलेंट बघून मिळतो जॉब; मुलाखतीला मास्क लावणं असतं बंधनकारक

2. डेटा अ‍ॅनॅलिटिक्स अ‍ॅप्रेंटिसशीप

किमान पात्रता:

- बॅचलर डिग्री किंवा समतुल्य प्रॅक्टिकल अनुभव.

- डेटा अ‍ॅनॅलिटिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कामाचा जास्तीत जास्त एका वर्षाचा अनुभव.

- गुगल वर्कस्पेस (उदा. जीमेल, क्रोम, डॉक्स, शीट्स, इ.) किंवा त्यासारखे अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्याचा अनुभव गरजेचा.

- अस्खलित इंग्रजी बोलण्याची आणि लिहिण्याची क्षमता.

कामाविषयी

गुगल डेटा अ‍ॅनॅलिटिक्स अ‍ॅप्रेंटिसशीप हा 24 महिन्यांचा लर्निंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅम प्रशिक्षणार्थींनी त्यांना नियुक्त केलेल्या कार्यालयात वैयक्तिकरित्या हजर होणं आणि संपूर्ण प्रोग्रॅममध्ये पूर्ण वेळ (आठवड्यातील 40 तास) सहभागी होणं अपेक्षित आहे. डेटा अ‍ॅनॅलिटिक्समध्ये करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांना सक्षम करण्यासाठी इन-क्लासरूम लर्निंगद्वारे गुगल टीमसोबत कामाचा अनुभव या अ‍ॅप्रेंटिसशीप दिला जाईल.

AIC Recruitment 2023: महिन्याचा तब्बल 60,000 रुपये पगार; इथे होतेय तब्बल 40 जागांसाठी भरती

जबाबदाऱ्या

- डेटाचं अचूक मूल्यांकन करणं आणि त्यातील विसंगती ओळखणं, नॉलेज शेअरिंगसाठी डॉक्युमेंट्स तयार करणं आणि गुगलच्या ग्राहकांसाठी इंडस्ट्री इनसाईट्ससाठी कस्टम अ‍ॅनालिसिस कंडक्ट करणं.

- डेव्हलपिंग करत असताना आणि लीडर्सकडून शिकत असताना रिअल टाईम समस्या सोडवण्यासाठी गुगलच्या टीमसोबत काम करण्याची तयारी आवश्यक. गुगल मीडिया शिफारशींचा इम्पॅक्ट मोजण्यासाठी डेटा वापरणं.

- डेटा लाइफसायकल आणि तो डेटा समस्यांचं निराकरण करणार्‍या विविध बिझनेस युनिट्समध्ये कसा भाषांतरित होतो याचं ज्ञान मिळवणं. विविध साधनं आणि तंत्रांसह सराव करणं, कृती करण्यायोग्य टेकअवेजसाठी डेटा डिस्टिल करणं आणि विविध बिझनेस ग्रुप्ससाठी त्याची शिफारसी करणं.

- आवश्यक डेटा अ‍ॅनालिसिस कौशल्ये विकसित करणं. डेटा ऑर्गनाइझ आणि अ‍ॅनलाइझ करण्यासाठी स्प्रेडशीट आणि प्रोग्रामिंग लँग्वेज वापरणं.

8वी पासना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; गव्हर्नमेंट प्रेसमध्ये 'या' पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय

3. प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅप्रेंटिसशीप

किमान पात्रता:

- बॅचलर डिग्री किंवा समतुल्य प्रॅक्टिकल अनुभव.

- प्रॉडक्ट मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएशनझाल्यानंतर कामाचा जास्तीत जास्त एका वर्षाचा अनुभव.

- गुगल वर्कस्पेस (उदा. जीमेल, क्रोम, डॉक्स, शीट्स, इ.) किंवा त्यासारखी अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्याचा अनुभव गरजेचा.

- अस्खलित इंग्रजी बोलण्याची आणि लिहिण्याची क्षमता.

कामाविषयी

गुगल प्रोजेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅप्रेंटिसशीप हा 24 महिन्यांचा लर्निंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅम प्रशिक्षणार्थींनी त्यांना नियुक्त केलेल्या कार्यालयात वैयक्तिकरित्या हजर होणं आणि संपूर्ण प्रोग्रॅममध्ये पूर्णवेळ (आठवड्यातील 40 तास) सहभागी होणं अपेक्षित आहे. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांना सक्षम करण्यासाठी इन-क्लासरूम लर्निंगद्वारे गुगल टीमसोबत कामाचा अनुभव या अ‍ॅप्रेंटिसशीप दिला जाईल.

SCI Recruitment: सुप्रीम कोर्टात तब्बल 1,23,100 रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडूच नका; अवघे काही दिवस शिल्लक

जबाबदाऱ्या

- कम्युनिकेशन, चेंज आणि रिस्क मॅनेजमेंटसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांमध्ये जनरल प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्कील्स विकसित करणं.

- कृती करण्यायोग्य टेकअवेजसाठी डेटा कसा डिस्टिल करायचा आणि डेटा-बॅक्ड शिफारसी कशा करायच्या यासह वाईड रेंज टुल्स आणि टेक्निक्स जाणून घेणं.

- प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीसाठी अंतर्गत साधनांचा समन्वय कसा करावा आणि प्रोजेक्ट टीमसह डॉक्युमेंट्स/रिपोर्ट्स कसे शेअर करावेत, तसेच संबंधितांना माहिती आणि रेग्युलर सपोर्ट कसा द्यावं हे शिकणं.

- पीअर्स, लीडर्स आणि सहकाऱ्यांसोबत वर्किंग रिलेशनशीप डेव्हलप करणं आणि टीम वर्क व कम्युनिकेशन स्कील्स विकसित करणं.

- प्रोजेक्टच्या स्कोपची समज विकसित करणं (उदा. कालमर्यादा, आर्थिक परिणाम इ.), संपूर्ण प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन कसं सुनिश्चित करावं आणि अहवाल तयार करणं किंवा त्याचं पुनरावलोकन करणं शिकणं.

First published: March 28, 2023, 12:30 IST
top videos
  • Nagpur News: विदर्भातील सर्वात मोठं फुलांचं मार्केट माहितीये का? दिवसाला होते 40 लाखांची उलाढाल, Video
  • Wardha News: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video
  • Pune News : राज्यावर येणार जल संकट, ज्योतिषांनी वर्तवला चिंता व्यक्त करणारा अंदाज VIDEO
  • Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video
  • Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video
  • Tags:Career, Career opportunities, Google, IT Jobs, Job Alert, Jobs Exams

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स