जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: ऑफिसमध्ये कामाचा ताण येतोय? टेन्शन घेऊच नका; 'या' उपायांनी राहा बिनधास्त

Career Tips: ऑफिसमध्ये कामाचा ताण येतोय? टेन्शन घेऊच नका; 'या' उपायांनी राहा बिनधास्त

Career Tips: ऑफिसमध्ये कामाचा ताण येतोय? टेन्शन घेऊच नका; 'या' उपायांनी राहा बिनधास्त

ऑफिसमध्ये कामाच्या ताणापासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय करता येतील. ताण कमी करण्यासाठीच्या खास टिप्स पाहूया

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर:  स्पर्धेच्या युगात काम करताना ताण येतोच. नोकरी, व्यवसाय-धंदा प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी-अधिक ताण असतो; मात्र तो ताण योग्य प्रमाणात असला, तर त्याचे चांगले परिणाम दिसतात. अन्यथा दुष्परिणामच दिसू लागतात. यामुळे कामात लक्ष लागत नाही. कामाचा ध्यास कमी होतो. एकाग्रता होत नाही. या सगळ्यामुळे तुमची प्रतिमा खराब होते. तुमच्याही बाबतीत असं झालं असेल, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय करता येतील. ताण कमी करण्यासाठीच्या खास टिप्स पाहू या. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढला, तर काम करायला नकोसं वाटतं. अशा परिस्थितीत कामावरचं लक्ष कमी होऊ शकतं. यामुळे उत्पादनक्षमताही कमी होते. कामाच्या ठिकाणी ताण येण्याची अनेक कारणं असू शकतात; मात्र त्यावर मात करून तणावरहित राहणं शक्य होऊ शकतं. त्यासाठी काही उपाय करता येतील. अशी हवी कंपनी! ‘या’ कंपनीत चेहरा बघून नव्हे तर टॅलेंट बघून मिळतो जॉब; मुलाखतीला मास्क लावणं असतं बंधनकारक नाही म्हणायला शिका ऑफिसमध्ये काम खूप जास्त असेल, तर ताण येतो. काम संपवण्याच्या डेडलाइन्समुळे तो ताण वाढतो. अशा वेळी प्रत्येक कामाला न्याय देता येत नाही. ताण येण्याचं हे मुख्य कारण असतं. एखादं काम असतानाही दुसऱ्या कामाची जबाबदारी कोणी सोपवत असेल, तर त्याला नाही म्हणणं जमलं पाहिजे. अन्यथा ताण येऊ शकतो. काही वेळा वरिष्ठांकडून काम सोपवलं गेल्यास नाही म्हणता येत नाही. अशा वेळी आपल्याकडे असलेल्या कामांची संपूर्ण माहिती त्यांना द्यावी. यामुळे त्यांनी दिलेल्या कामासाठी योग्य डेडलाइन ते ठरवू शकतील. यामुळे तुमच्यावरचा ताण कमी होईल. AIC Recruitment 2023: महिन्याचा तब्बल 60,000 रुपये पगार; इथे होतेय तब्बल 40 जागांसाठी भरती कामाचं नियोजन करा कामाचं नियोजन नसेल, तरीही ताण येतो. म्हणून दुसऱ्या दिवशीच्या कामाचं नियोजन आदल्या दिवशी घरी जाण्यापूर्वीच करा. यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये आल्यावर लगेचच कामाला लागू शकता व वेळेची बचत करू शकता. नियोजन केलं नाही, तर कामाची प्राथमिकता ठरवता येत नाही व गोंधळ उडू शकतो. चुगल्या करू नका ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या चुगल्या करणं, तक्रारी करणं असं केल्यामुळे उगाचच कामाचा वेळ वाया जातो. त्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित केलं तर चांगलं काम होतं व ताणही येत नाही. आपल्यावर सोपवलेलं काम चांगलं व वेळेत करणं हा उद्देश ठेवला तर पुष्कळ काम करता येतं. त्यामुळे ताणही हलका होतो. 8वी पासना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; गव्हर्नमेंट प्रेसमध्ये ‘या’ पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय 5 मिनिटांसाठी चक्कर मारून या खुर्चीत कित्येक तास बसून काम केल्याने शारीरिक व मानसिक थकवाही येतो. त्यानं कामात लक्ष लागत नाही. म्हणून असा थकवा जाणवत असेल, तर 5 मिनिटांसाठी एक चक्कर मारून या. यामुळे तुम्हाला पुन्हा जोमानं काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

कामाच्या ठिकाणी येणारा ताण हलका करणं आपल्याच हातात असतं. काही चुकीच्या सवयी किंवा काही वेळेला अनावश्यक घेतलेल्या जबाबदाऱ्या ताण वाढवतात. म्हणून ताण कमी करण्यासाठी कामाचं नियोजन करून कामावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात