मुंबई, 27 ऑक्टोबर: द ऑफिस ऑफ ब्रँच ऑफिसर (रिक्रुटमेंट), सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने एका जागेसाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पोस्ट डायरेक्टर (लायब्ररी) ही जागा भरली जाणार आहे. या पदासाठी पात्र इच्छुक उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत प्रोफॉर्मामध्ये अर्ज करू शकतात. 31 मार्च ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असेल. याबाबतचं वृत्त ‘स्टडी कॅफे’ ने दिलं आहे. SCI Recruitment 2023 च्या नोटिफिकेशननुसार 1 जागा भरली जाणार आहे. पदाचं नाव: डायरेक्टर (लायब्ररी) वेतन पे स्केल: पे मॅट्रिक्समधील लेव्हल 13 नुसार या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला बेसिक पेमेंट 1,23,100 आणि नियमांनुसार इतर अलाउन्सेस देण्यात येतील. अशी हवी कंपनी! ‘या’ कंपनीत चेहरा बघून नव्हे तर टॅलेंट बघून मिळतो जॉब; मुलाखतीला मास्क लावणं असतं बंधनकारक जास्तीत जास्त वयोमर्यादा किती उमेदवाराचं वय 01.03.2023 या तारखेपर्यंत 40 वर्षांपेक्षा जास्त नसावं. एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन - मान्यताप्राप्त विद्यापीठातून LL.B. ची डिग्री पूर्ण केलेली असावी. तसंच बार काउन्सिल ऑफ इंडिया (BCI) किंवा स्टेट बार काउन्सिलकडून अॅडव्होकेट म्हणून एनरोलमेंट झालेली असावी. - मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्सची मास्टर्स डिग्री पूर्ण केलेली असावी. - AICTE/DOEACC मान्यताप्राप्त कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमा किंवा नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोर्सेसद्वारे आयोजित लायब्ररी ऑटोमेशन कोर्स झालेला असावा. - कम्प्युटर ऑपरेशनचं नॉलेज असावं. - लायब्ररीतील कामासाठी कोणतंही स्टँडर्ड “लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर” वापरून काम करण्याचं ज्ञान आणि अनुभव असावा. जसं की कॅटलॉगिंग, अॅक्विझिशन आणि सर्क्युलेशन इ. - ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही डेटाबेसच्या संगणकीकृत शोधाचे ज्ञान आणि अनुभव - डॉक्युमेंटेशन कामासाठी इन-हाउस डेटाबेस विकसित करण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरचे ज्ञान आणि अनुभव. AIC Recruitment 2023: महिन्याचा तब्बल 60,000 रुपये पगार; इथे होतेय तब्बल 40 जागांसाठी भरती विशेष ज्ञान - लीगल मॅटरमध्ये रिसर्च वर्क करणं. - डॉक्युमेंटेशन वर्क - केसेसची बिबलोग्राफी तयार करणं. - विविध लॉ जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या कायद्याविषयीच्या लेखांची तपासणी करणं. 8वी पासना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; गव्हर्नमेंट प्रेसमध्ये ‘या’ पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय कामाचा अनुभव - चिफ लायब्ररीयन म्हणून किमान 4 वर्षांचा अनुभव किंवा समान पदावर (पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 12 मध्ये) कोणत्याही प्रतिष्ठित लॉ लायब्ररीमध्ये कामाचा अनुभव किंवा चिफ लायब्ररीयन म्हणून दोन वर्षांच्या अनुभवासह (पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 12 मध्ये) किमान 7 वर्षांचा संमिश्र अनुभव. निवडीचे निकष निवड प्रक्रियेसाठी योग्य उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील. हे कम्युटर टेस्ट व मुलाखतीच्या आधारे केले जाईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना अंतिम प्रोसेससाठी कम्प्युटर टेस्ट व मुलाखत द्यावी लागेल. कंपिटंट अथॉरिटी अप्रूव्हलनुसार कोणत्याही प्रकारे अर्जदारांची निवड करण्याचा अधिकार रजिस्ट्रीकडे राखीव आहे.
अर्ज कसा करायचा SCI Recruitment 2023 च्या नोटिफिकेशननुसार, 01.03.2023 रोजी नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व पात्रता पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, स्पेशलाइज्ड नॉलेज व अनुभव या डॉक्युमेंट्सच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी आणि पासपोर्ट साइज फोटो अर्ज भरण्यासाठी लागतील.