मराठी बातम्या /बातम्या /करिअर /अशी हवी कंपनी! 'या' कंपनीत चेहरा बघून नव्हे तर टॅलेंट बघून मिळतो जॉब; मुलाखतीला मास्क लावणं असतं बंधनकारक

अशी हवी कंपनी! 'या' कंपनीत चेहरा बघून नव्हे तर टॅलेंट बघून मिळतो जॉब; मुलाखतीला मास्क लावणं असतं बंधनकारक

 इंटरव्ह्यूवेळी मास्क लावणं असतं बंधनकारक

इंटरव्ह्यूवेळी मास्क लावणं असतं बंधनकारक

एका चिनी कंपनीने मुलाखतीसाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. या कंपनीत मुलाखतीला मास्क लावून जावं लागतं. कारण...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 ऑक्टोबर:  आजकाल सरकारी असो अथवा खासगी बहुतेक सर्वच कंपन्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अर्थात इंटरव्ह्यू घेतात. यात उमेदवाराची क्षमता तपासली जाते. तसेच उमेदवार त्या नोकरीसाठी योग्य आहे की नाही,तो काम नीट करेली की नाही हेदेखील पाहिले जाते. उमेदवार कंपनीसाठी किती फायदेशीर आहे, त्याचा स्वभाव, चारित्र्य आणि आत्मविश्वास कसा आहे, या गोष्टीदेखील मुलाखतीवेळी पाहिल्या जातात. जेव्हा आपण मुलाखतीसाठी जातो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. घाबरून जाऊ नये, आत्मविश्वास चांगला ठेवावा, चांगलं दिसणं गरजेचं असल्याने योग्य पेहेराव करावा अशा प्रकारचा सल्ला या वेळी लोक आपल्याला देत असतात. पण हे सगळं असताना एका चिनी कंपनीने मुलाखतीसाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. या कंपनीत मुलाखतीला मास्क लावून जावं लागतं. कारण नोकरीसाठी चेहऱ्यापेक्षा पात्रता महत्त्वाची असते, असं या कंपनीचं मत आहे.

AIC Recruitment 2023: महिन्याचा तब्बल 60,000 रुपये पगार; इथे होतेय तब्बल 40 जागांसाठी भरती

`साउथ चायना मॉर्निंग पोस्ट`च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एका कंपनीने मुलाखती घेतल्या. या मुलाखतींचा व्हिडिओ चीनमधील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, मुलाखतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांनी आपला चेहरा मास्कने पूर्णपणे झाकल्याचे दिसते. त्यांच्या चेहऱ्याचा कोणताही भाग दिसत नव्हता. इतकंच नाही तर मुलाखत घेणाऱ्या टीममधील प्रत्येक व्यक्तीनं देखील पूर्ण चेहऱ्यावर मास्क लावला होता. या वेळी कोणी कॅट मास्क, डॉग मास्क तर कोणी एलियन मास्क परिधान करून आलं होतं. जेंग नावाच्या महिलेनं तीन फेब्रुवारीला हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला होता. ज्या लोकांना आपल्या लुक्समुळे भीती वाटते, अशा लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल, असं तिनं लिहिलं होतं.

`योग्य उमेदवाराची निवड हाच आमचा उद्देश`

चेंगदू अँट लॉजिस्टिक्स या कंपनीनं हा व्हिडिओ त्याच्या संस्थेचा असल्याचं मान्य केलं आहे. नवीन मीडिया ऑपरेटर, लाईव्ह-स्ट्रीम ब्रॉडकास्टर आणि डाटा विश्लेषक या पदांसाठी मुलाखती घेण्यात येत होत्या, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. आम्ही लोकांच्या क्षमतेवर अधिक लक्ष केंद्रित करतो. कोण चांगलं दिसतं यापेक्षा चांगलं काम कोण करू शकतं, हे आम्ही तपासतो. उत्तम उमेदवाराची निवड करणं हा आमचा उद्देश आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. या प्रयोगामुळे उमेदवाराला तणाव जाणवत नाही, असा दावा देखील कंपनीनं केला आहे.

8वी पासना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; गव्हर्नमेंट प्रेसमध्ये 'या' पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय

अनोख्या मुलाखतींसाठी प्रसिद्ध आहे कंपनी

सोशल मीडियावर लोक या प्रकाराचं जोरदार कौतुक करत आहेत. ``ही समानता आहे. केवळ चांगलं दिसणं ग्राह्य धरलं जाऊ नये. यामुळे लोक सोशल फोबियातून बाहेर येतील. हा विचार प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे, ``असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे. काही लोकांनी काही कंपन्यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ``चांगला लूक असलेल्या तरुणींना संधी दिली जाते. पण यामुळे चांगली क्षमता असलेले उमेदवार नोकरीपासून वंचित राहतात.`` ही कंपनी वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखली जाते. या कंपनीने यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान उमेदवारांना उद्यानात कुदळ मारायला लावली होती. यातून कंपनीने उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेतली होती.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert