किम जोंग उननंतर कोण? उत्तर कोरियात 'कहानी में ट्विस्ट'; सत्तासंघर्ष अटळ

किम जोंग उननंतर कोण? उत्तर कोरियात 'कहानी में ट्विस्ट'; सत्तासंघर्ष अटळ

किम जोंग उन यांच्या अस्तित्वाचं गूढ अजून उलगडलेलं नाही, पण उत्तर कोरियात त्यांच्यानंतर कोण याची चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला किम जोंगच्या बहिणीचं नाव घेण्यात येत होतं, पण अचानक पूर्वी सत्ता नाकारलेला त्यांचा काका मध्ये आला आहे.

  • Share this:

प्योंगयोंग, 30 एप्रिल : उत्तर कोरियाचे हुकूमशहा सम्राट किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल अद्यापही गूढ कायम आहे, पण या देशात नवीन वारस शोधण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला किम जोंग उननंतर त्यांच्या धाकट्या बहिणीकडे सत्ता येणार असं म्हटलं जात होतं, पण अचानक त्यांचे सावत्र काका चर्चेत आले आहेत.

किम जोंग उन यांच्यावरची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि ते कोमात गेले असल्याच्या बातम्या आहेत. या देशाने अद्याप याबाबत कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. किम जोंग उन कदाचित जिवंत नसावेत, अशाही बातम्या यते आहेत. पण आता उत्तर कोरियात किम जोंग यांचा वारसदार शोधण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचं दिसतं. किम जोंग यांचे काका किम प्योंग इल यांचं नाव चर्चेत आहे.

संबंधित - किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी

किम प्योंग यांचा सुरुवातीपासूनच उत्तर कोरियाच्या सिंहासनावर दावा राहिलेला आहे. किम जोंग उन यांच्या वडिलांशी त्यांचं कधी फारसं पटलं नाही, त्यामुळे सध्याच्या राजघराण्यापासून ते लांब राहिले. पण आता किम जोंग उन मृत्यूशय्येवर असल्याच्या बातम्या येऊ लागल्यावर पुन्हा एकदा किम प्योंग इल यांचं नाव चर्चेत आलं आहे.

किम जोंग यांची Love Story: उ. कोरियाचा हुकूमशाह पडला होता चिअर लीडरच्या प्रेमात

किम जोंग उन यांच्या वडिलांचे भाऊ किम इल संग यांना त्यांच्या सेक्रेटरीपासून झालेला मुलगा आहे. पण उत्तर कोरियाच्या पितृसत्ताक इतिहासाकडे पाहता स्त्रीऐवजी राज्यपद पुरुषाकडे जायची शक्यता अधिक मानली जात आहे.

संबंधित सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये जखमी की मृत्यू? किम गायब झाल्यानंतर रंगल्या 5 चर्चा

उत्तर कोरियाची सत्ता गेली कित्येक वर्षं किम घराण्याकडे आहे. किम जोंग इल यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे म्हणजे सध्याचे राजे किम जोंग उन यांच्याकडे 2010 मध्ये सत्ता आली. आता त्यांच्यानंतर कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. किम जोंग उन यांना तीन मुलं असल्याचं समजतं. पण त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच जगापासून गुप्त ठेवलं आहे. त्याची तीनही मुलं अजून लहान आहेत. त्यामुळे अंदाजे 10 वर्षाचा मोठा मुलगा कदाचित राजा होईल आणि त्याच्या नावाने किम जोंग उन यांची धाकटी बहीण राज्यकारभार बघेल असं सांगितलं जातं.

उत्तर कोरियात पहिल्यापासून पितृसत्ताक आहे. अलीकडच्या इतिहासात या देशाने सत्तेवर राणी पाहिलेली नाही. धाकटी बहीण किम यो जोंग राज्यकारभार हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात होती तेव्हाही ती किम जोंग उन यांच्या मुलाला हुकूमशहा घोषित करून सत्ता चालवेल, असं बोललं जात होतं. पण आथा अचानक प्योंग इल यांचं नाव चर्चेत आलं आहे.

संबंधित किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! आता खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर

किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांचं प्योंग इल यांच्याशी कधी फारसं पटलं नाही. सत्तेच्या स्पर्धेत किम जोंग इल यांनी आपल्या या भावाला मागे टाकलं आणि हुकूमशहा बनले. त्यानंतर किम प्योंग इल यांनी सत्तेपासून दूर राहात उच्चाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या.

आता किम जोंग उन यांच्या अचानक नसण्याने निर्माण झालेल्या पोकळीत किम प्योंग पुन्हा एकदा आपला दावा साधण्यास सिद्ध झाल्याचं समजतं. किम जोंग उन यांनी त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या आहेत. किम यो यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. पण तरीही फक्त 32 वर्षाची आणि त्यातून एक स्त्री असल्यामुळे त्यांचा राजपदाचा दावा फेटाळला जाऊ शकतो.

अन्य बातम्या

Coronaविरोधी लढ्यात मुक्या जीवांची मदत, लवकरच कुत्रा ओळखणार कोरोनाग्रस्त व्यक्ती

VIDEO : महिलेच्या कानात घुसला कोळी, काही दिवसांनंतर अशी झाली होती अवस्था

VIDEO : महिलेच्या कानात घुसला कोळी, काही दिवसांनंतर अशी झाली होती अवस्था

First published: April 30, 2020, 3:33 PM IST

ताज्या बातम्या