Home /News /videsh /

किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी

किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी

किम जोंग उन यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्यांनी पत्नी आणि मुलालासुद्धा जगापासून दूर ठेवलं आहे.

    सियोल, 21 एप्रिल : उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी किम जोंग उन यांची प्रकृती नाजूक असल्याचा दावा केला होता. मात्र दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी यामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. सीएनएनने असा दावा केला होता की, किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यांची प्रकृती अद्याप नाजूक असून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्यांचा ब्रेन डेड झाल्याची शक्यताही व्यक्त केली होती. जगातील गूढ अशा देशांमध्ये उत्तर कोरियाचा समावेश आहे. त्यात किम जोंग यांच्या जीवनशैलीचीही चर्चा होत असते. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. आतापर्यंत त्यांच्या आयुष्याबद्दल जगाला काहीच माहिती नाही. किम जोंग उन यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुले आहे. मात्र त्यांनी कुटुंबाला अजुनही जगाच्या नजरेपासून दूर ठेवलं आहे. किम जोंग उन यांच्या पत्नीचं नाव री सोल जू असं आहे. 2012 मध्ये उत्तर कोरियाच्या माध्यमांनी सांगितंल होतं की त्यांचं लग्न झालं आहे. किम जोंग उन यांच्या वडिलांचे 2008 मध्ये निधन झाल्यानंतर 2009 मध्येच किम जोंग उन यांनी गडबडीत लग्न केल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर 2010 मध्ये किम जोंग दाम्पत्याला पहिलं अपत्य झालं. त्यांना तीन अपत्ये असून त्यांच्याबद्दलची खूप कमी माहिती आहे. हे वाचा : किम जोंग उन यांनी असं काय केलं की Coronavirus पासून वाचला देश किम जोंग यांच्या कुटुंबाची माहिती सर्वात विश्वासू अशा त्यांच्या गुप्तचर खात्यातील अधिकाऱ्यांकडेच आहे. याशिवाय त्यांच्या खासदारांनीही असं म्हटलं आहे की, किम जोंग उन यांची तीन मुलं आहेत. अमेरिकेचा माजी बास्केटबॉलपटू डेनिस रोडमनने 2013 मध्ये उत्तर कोरिया दौरा केला होता. तेव्हा त्यानं दावा केला होता की किम जोंग उनच्या मुलीला आपण हातात घेतलं होतं. हे वाचा : किम जोंग उन यांना नेमकं झालं काय? Grave Danger चा काय आहे अर्थ? दरम्यान, किम जोंग उन यांच्या नाजूक प्रकृतीचा विचार करता त्यांची धाकटी बहिण किम यो जोंग राज्यकारभार हातात घेण्याची शक्यता आहे. यासाठी ती किम जोंग उन यांच्या मुलाला हुकुमशहा घोषित करून सत्ता चालवू शकते. किम यांचा मुलगा फक्त दहा वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत किम यो जोंगची भूमिका महत्वाची असणार आहे. किम जोंग यांनी त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या आहेत. किम यो यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. किम योच्या प्रवेशानंतर असे मानले जाते की किम जोंग उननंतर ती आता सर्वात ताकदवान नेता बनली आहे. किम यो जोंग यांना किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानलं जातं. हे वाचा-उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Kim jong un

    पुढील बातम्या