मराठी बातम्या /बातम्या /विदेश /किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! अनेक दावे होत असताना खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर

किम जोंग यांच्या तब्येतीचं गूढ! अनेक दावे होत असताना खास ट्रेनचे सॅटेलाइट फोटो आले समोर

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या तब्येतीबद्दल उलट सुलट बातम्या येत असताना आता त्यांच्या खासगी ट्रेनचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या तब्येतीबद्दल उलट सुलट बातम्या येत असताना आता त्यांच्या खासगी ट्रेनचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या तब्येतीबद्दल उलट सुलट बातम्या येत असताना आता त्यांच्या खासगी ट्रेनचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत.

प्योंगयोंग, 26 एप्रिल : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांत अनेक दावे केले जात आहेत. किम जोंग कोमामध्ये गेल्याचाही दावा काही माध्यमांनी केला. दरम्यान, शनिवारी रात्री हाँगकाँगच्या एका चॅनेलने त्यांच्या बातमीमध्ये किम जोंग यांच्या मृत्याचाही दावा केला आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाच्या एका माध्याने किम यांची प्रकृती ठीक असून ते चालत फिरत असल्याचंही सांगितलं आहे. तर चीनने किम यांच्यासाठी डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला पाठवल्याचं म्हटलं जात आहे. इतक्या साऱ्या बातम्या येत असताना किम जोंग किंवा उत्तर कोरियातून मात्र काहीच सांगितलं जात नसल्यानं यावर विश्वासही ठेवला जात आहे.

चीनमधील एका मेडिकल टीमच्या डॉक्टरने जपानी मॅगझिनला सांगितलं की, किम जोंग गेल्या काही महिन्यांपासून हृदयाच्या आजाराशी झुंज देत आहेत. काही दिवसांपूर्वी ते चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर किम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची सर्जरी झाली असून हृदयात स्टेंट घालावं लागण्याची शक्यता आहे.

हे वाचा : किम जोंग यांची प्रकृती खालावली? चीनच्या डॉक्टरांची टीम उत्तर कोरियात दाखल

दरम्यान, दक्षिण कोरिया आणि चीनच्या अधिकाऱ्यांनी किम जोंग यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं फेटाळून लावलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की,'सर्जरीनंतर किम यांच्या जीवाला धोका आहे.' यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग आजारी असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं.

बिंजिंगमधील एचकेएसटीव्ही चॅनेलने किम जोंग यांचे निधन झाल्याचं वृत्त दिलं आहे. तर इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने म्हटलं की, चीनी मेसेंजिंग अॅप विबोवर किम यांच्या मृत्यूची पोस्ट व्हायरल होत आहे. दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये किम जोंग यांच्यावर हृदयाच्या शस्त्रक्रियेवेळी चूक झाल्याचं सांगण्यात आलं.

हे वाचा : किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी

जगभरात किम जोंग उन यांच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत असताना दक्षिण कोरियाच्या माध्यमात वेगळीच गोष्ट सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील चॅनेल 7 नेसुद्धा हे वृत्त प्रसारीत केलं आहे. या वृत्तानुसार, किम त्यांच्या लग्झरी रिसॉर्टवर आहेत. त्यांच्या खासगी ट्रेनने मोजक्या स्टाफसोबत रिसॉर्टवर पोहोचले.

हे वाचा : किम जोंग उन कोमात, आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा

वॉशिंग्टनमधील नॉर्थ कोरिया मॉनिटरिंग प्रोजेक्टने यासंदर्भात सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध करत किम उत्तर कोरियातील लग्झरी बीच रिसॉर्टमध्ये असल्याचं म्हटलं आहे. मॉनिटरिंग प्रोजेक्ट 38 नॉर्थने म्हटलं आहे की, 21 ते 23 एप्रिलला वोन्सानच्या लीडरशिप स्टेशनवर किम जोंग यांची ट्रेन दिसली. या ट्रेनचा वापर किम आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य करतात. ट्रेनवरून किम यांच्या तब्येतीचा अंदाज लावता येणार नाही मात्र किम त्यांच्या लग्झरी बीच रिसॉर्टवर आहेत सांगता येईल.

हे वाचा : कोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस घेतोय कमी जीव

संपादन- सूरज यादव

First published:

Tags: Kim jong un