Home /News /videsh /

सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये झाले जखमी की मृत्यू? किम जोंग गायब झाल्यानंतर रंगल्या 'या' 5 चर्चा

सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये झाले जखमी की मृत्यू? किम जोंग गायब झाल्यानंतर रंगल्या 'या' 5 चर्चा

नॉर्थ कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेनं किम जोंग उन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मानवी मृतदेहांचा वापर खतांसारखा करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

नॉर्थ कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेनं किम जोंग उन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मानवी मृतदेहांचा वापर खतांसारखा करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

किम जोंग आहेत कुठे? जीवंत आहेत की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नसली तरी या 5 शक्यता सध्या चर्चेत आहेत.

    प्योंगयांग, 29 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) गायब झाल्यापासून त्यांच्याबाबत विविध चर्चा रंगल्या. अगदी त्यांच्या मृत्यूपासून ते कोमात गेल्यापासून. किम यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया झाली, ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे काही वृत्तसंस्थांनी सांगितले आहे. या सगळ्यांमध्ये किती तथ्य आहे हे कोणालाच माहित नाही. किम यांच्यावर उपचार करण्यासाठी चीनमध्ये डॉक्टर रवाना झाल्याचेही वृत्त होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी किम जोंग यांची ट्रेन मागील आठवड्यात या शहराजवळ दिसली होती. याचे सॅटेलाइट फोटो व्हायरलही झाले होते. तर, काही वृत्तसंस्थांनी 15 ते 20 एप्रिल दरम्यान किम यांना फेरफटका मारतानाही पाहिले होते. अशाच तब्बल एक, दोन नाही कर 5 चर्चा रंगल्या. 1. सर्जरीनंतर विश्रांती घेत आहेत किम किम यांची प्रकृती नाजूक असल्याची बातमी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर लगेचच दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने डेली एनके या सियोलच्या न्यूज वेबसाइटच्या संदर्भ देत हवाल्याने असे वृत्त दिले आहे की, किम यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या त्यांना माउंट कुमगांग येथील रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे. या वृत्तानुसार, 12 एप्रिल रोजी किम जोंग यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाचे मंत्रालय आणि नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना तातडीने वृत्ताबाबत सांगता येणार नाही. दोन कोरियन देशांमधील प्रकरणे हाताळणारे युनिफिकेशन मंत्रालय म्हणाले की, प्योंगयांग येथे किम यांच्यावर हृदयविकाराची शल्यक्रिया झाली आहे, मात्र त्यांची प्रकृती सुधारत आहे. वाचा-ना मृत्यू, ना कोमा; तर किम जोंग 'या' कारणामुळे झालेत अंडरग्राउंड 2. किम यांची प्रकृती नाजूक दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क पोस्टनं जपानच्या मीडियाचे संदर्भ देत किम जोंग कोमामध्ये गेल्याचे सांगितले होते. तर, मेट्रो यूकेनुसार किम जोंग उन यांच्या मृत्यूबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. मात्र त्यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असल्याचे समोर आले आहे. मेट्रो यूकेने केलेल्या दाव्यात, किम यांच्यावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या भीतीने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, जपानच्या साप्ताहिक मासिक शुकान बल्लाईने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने किम जोंग यांना गंभीर धोका आहे आणि त्याचे कारण स्वतः डॉक्टर आहेत. वाचा-किम यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून झाली चूक 3. कोरोनाला घाबरून किम अंडरग्राउंड ब्रिटिश वृत्तपत्र द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे वृत्तपत्र जुन्गअंब लबोनं अशी बातमी दिली आहे की, किम जोंग बाहेर येत नाही आहेत, कारण त्यांच्या बॉडिगार्डला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण कोरियाची आणखी एक वृत्तपत्र डॉनंग-ए-लबोनं असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीनं किम जोंग प्योंगयांगच्या बाहेर एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, किम यांच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं किम यांना क्वारंटाइन केले असण्याची शक्यता आहे. 4. सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये झाले जखमी सेनेच्या एका मॉक ड्रीमध्ये किम जखमी झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. किम बेपत्ता झाल्यापासून वोन्सान रिसोर्ट विशेष चर्चेत आहे. येथे खास मिसाइलची तपासणी केली जाते. दरम्यान काही दिवसांपूर्वी येथे मिसाइल चाचणी झाल्याचे फोटोही आहेत. यावेळी एक किम यांची ट्रेन वोन्सान रेल्वे स्थानकावर उभी होती. दरम्यान यावेळी सैनिकांच्या वतीनं एक मॉक ड्रील करण्यात आला होता. यात किम जखमी झाले, त्यानंतर किम गायब झाले आहेत. वाचा-किम जोंग यांची Love Story: उ. कोरियाचा हुकूमशाह पडला होता चिअर लीडरच्या प्रेमात 5. जगाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी युक्ती दक्षिण कोरियाचे खासदार युन सांग-ह्युन यांच्या म्हणण्यानुसार, किम सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी स्वत: गायब झाले आहेत. त्यामुळं एक-दोन आठवड्यात ते पुन्हा सर्वांसमोर येऊ शकतात. युनने डोंगा डेलीला सांगितले आहे की किम काही आठवड्यांत पुढे न आल्यास ही मोठी बाब ठरू शकते. दरम्यानस किम यांच्या गायब होण्याचे कारण अद्याप कळलेले नाही आहे. याआधीही 2014 मध्ये किम 6 आठवडे कोणालाही दिसले नव्हते. यामागील कारण आजपर्यंत समोर आलेले नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Kim jong un

    पुढील बातम्या