उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबाबत जगभरात वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही मीडिया रिपोर्टमध्ये किम जोंग यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे. तर, काहींनी किम कोमामध्ये गेल्याचे सांगितले आहे. किम यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया झाली, ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचे काही वृत्तसंस्थांनी सांगितले आहे.
त्यानंतर दक्षिण कोरियाच्या (South Korea) दोन वृत्तपत्रांनी किम जोंग पूर्णत: ठिक असून अंडरग्राउंड झाले आहेत, अशी माहिती दिली आहे
हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर किम गंभीर आजारी असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी या बातमीचे खंडन केले आहे.
CNN नंतर आता हाँगकाँगच्या मीडियानेही किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र आता किम कोरोनामुळं अंडरग्राउंड झाल्याचंही बोललं जात आहे
दरम्यान या सगळ्या घटनांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्यानंतर किम यांची लव्ह स्टोरी देखील चर्चेचा विषय बनली आहे.
किम आणि रि सोल यांची लव्ह स्टोरी चर्चेचा विषय बनली आहे, कारण त्यांचे वडील आणि आजोबांनी अनेक लग्न केली होती. त्यांच्या रखेल देखील होत्या. मात्र किम यांनी एकच लग्न केलं आहे. त्यांनी 2009 मध्ये लग्न केलं.
ऑर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्या मुलीवर किम यांचं प्रेम जडलं. ती आधी चिअर लीडर देखील होती. आता ती उत्तर कोरियाची ‘फर्स्ट लेडी’ आहे. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली असून त्यांना 3 मुलं असल्याचंही बोललं जात आहे. (फोटो सौजन्य- AP)
रि सोलचे वडील उत्तर कोरियामध्ये प्रोफेसर होते तर आई स्त्री रोग तज्ज्ञ. मध्यमवर्गील कुटुंबातील असणारी रि सोल महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चीनमध्ये संगीत शिक्षण घेत होती. (फोटो सौजन्य- AFP)
दक्षिण कोरियामध्ये 2005 मध्ये पार पडलेल्या एशियन एथेलेटिक चँपियनशीपमध्ये तिची चिअरलीडर म्हणून निवड झाली होती. (फोटो सौजन्य- AFP)
त्यानंतर ऑर्केस्ट्रामध्ये गाताना तिला किम यांनी पाहिलं होतं. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. किमचे वडील आणि त्यावेळचे प्रशासक यांनाही या प्रेमाबद्दल कळलं असावं. (सौजन्य-AFP)
रि सोल यांना सहा महिन्यासाठी किम यांच्या महालात राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. आणि 2009 मध्ये त्यांचं लग्न झालं. (सौजन्य- Reuters)
दोन वर्षांपूर्वी किम जेव्हा चीन दौऱ्यावर होते, त्यावेळी रि सोल देखील त्यांच्याबरोबर होत्या. तेव्हा संपूर्ण जगाने पहिल्यांदा त्यांच्या पत्नीला पाहिलं. सोल अत्यंत फॅशनेबल आणि ग्लॅमरस ‘फर्स्ट लेडी’ आहेत.