मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

108 MP कॅमेरासह Xiaomi 11T Pro लाँच, पहिल्याच सेलमध्ये मिळेल 10 हजारांची सूट

108 MP कॅमेरासह Xiaomi 11T Pro लाँच, पहिल्याच सेलमध्ये मिळेल 10 हजारांची सूट

शाओमीने (Xiaomi) नवा स्मार्टफोन Xiaomi 11T Pro भारतात लाँच केला आहे. कंपनीने या जबरदस्त स्मार्टफोनला द हायपरफोन (The Hyperphone) असं म्हटलं आहे.

शाओमीने (Xiaomi) नवा स्मार्टफोन Xiaomi 11T Pro भारतात लाँच केला आहे. कंपनीने या जबरदस्त स्मार्टफोनला द हायपरफोन (The Hyperphone) असं म्हटलं आहे.

शाओमीने (Xiaomi) नवा स्मार्टफोन Xiaomi 11T Pro भारतात लाँच केला आहे. कंपनीने या जबरदस्त स्मार्टफोनला द हायपरफोन (The Hyperphone) असं म्हटलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 19 जानेवारी : शाओमीने (Xiaomi) नवा स्मार्टफोन Xiaomi 11T Pro भारतात लाँच केला आहे. कंपनीने या जबरदस्त स्मार्टफोनला द हायपरफोन (The Hyperphone) असं म्हटलं आहे. या फोनला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आल्याने याला Hyperphone असं म्हटलं आहे. या फोनच्या पहिल्याच सेलवर धमाकेदार डिस्काउंट मिळतो आहे. हा फोन पहिल्याच सेलमध्ये 10 हजारहून कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

हे वाचा - Amazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone

Xiaomi 11T Pro स्पेसिफिकेशन्स -

Xiaomi 11T Pro फोनला प्लास्टिक फ्रेमसह ग्लास सँडविच डिझाइन आहे. फोनला 6.67 इंची फ्लॅट AMOLED डिस्प्ले असून त्याचं रिजोलूशन 2400 x 1080 पिक्सल (FHD +) आहे. 120Hz AdaptiveSync रिफ्रेश रेट आणि 480Hz टच सँपलिंग आहे. फोनला Android 11, Octa-core Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोनला 5,000mAh देण्यात आली आहे. कंपनीने केवळ 17 मिनिटांत 2 टक्क्यांवरुन 100 टक्क्यांपर्यंत फोन चार्ज होण्याचा दावा केला आहे.

हे वाचा - सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

कॅमेरा -

Xiaomi 11T Pro फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड यूनिट आणि ऑटोफोकससह 5 मेगापिक्सल टेलीमॅक्रो स्नॅपर आहे. त्याशिवाय सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 8K 30 fps, 4K 60fps आणि HDR10+ व्हिडीओ रेकॉर्डही करता येणार आहे.

हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. Xiaomi 11T Pro फोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 41,999 रुपये, आणि 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 43,999 रुपये आहे.

हे वाचा - 2000रुपयांहून कमी किमतीत घ्या 4Gचा आनंद,2 वर्षांपर्यंत करावा लागणार नाही रिचार्ज

स्मार्टफोनच्या लाँच ऑफरमध्ये सिटी बँक कार्डवर 5000 रुपयांची सूट आणि एक्सचेंजवर 5000 रुपयांची ऑफर आहे. त्यामुळे या दोन्ही ऑफरचा फायदा घेतल्यास हा लेटेस्ट Xiaomi 11T Pro फोन 10 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटमध्ये मिळू शकतो.

First published:

Tags: Smartphone, Tech news, Xiaomi, Xiaomi redmi