जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

सरकारने भारतात आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्डचे (International roaming sim card) नियम बदलले आहेत. सुधारित अटी आणि नियम परदेशात जाणाऱ्या भारतीय जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी सिस्टम आणखी मजबूत करण्यासाठी काम करेल असं दूरसंचार मंत्रालयाने म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जानेवारी : सरकारने भारतात आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्डचे (International roaming sim card) नियम बदलले आहेत. टेलिकॉम डिपार्टमेंटने (DOT) भारतात आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्ड, ग्लोबल कॉलिंग कार्ड्सची विक्री, भाडे तत्वावर NOC, रिन्यूसाठी नियम आणि अटींमध्ये बदल केले आहेत. TRAI च्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित अटी आणि नियम परदेशात जाणाऱ्या भारतीय जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी सिस्टम आणखी मजबूत करण्यासाठी काम करेल असं दूरसंचार मंत्रालयाने म्हटलं आहे. सुधारित धोरणानुसार, NOC होल्डर्सला कस्टमर केयर सर्विस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, टॅरिफ प्लॅन इत्यादीची माहिती द्यावी लागेल, ही बाब अनिवार्य असणार आहे. DOT ने ग्राहकांच्या तक्रारींचं समाधान करण्यासाठी बिलिंगची तरतूद केली आहे. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

हे वाचा -  Google Search: चुकूनही गुगलवर या गोष्टी सर्च करू नका, होऊ शकतं मोठं नुकसान

9 हून अधिक सिम असणाऱ्यांसाठी नियम - याआधी डिसेंबरमध्ये दूरसंचार विभागाने (DoT) नवा नियम जारी केला होता, ज्यात अधिक सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली होती. आता दूरसंचार विभागाच्या नव्या नियमांनुसार 9 हून अधिक सिम असणाऱ्या युजरला सिम कार्डची पडताळणी करणं बंधनकारक आहे. जर हे सिम कार्ड वेरिफाय झाले नाहीत, तर ते बंद केले जातील असंही सांगण्यात आलं आहे. टेलिकॉम डिपार्टमेंटने टेलिकॉम कंपन्यांना असे सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून हटवण्यास सांगितले आहेत, जे नियमांनुसार वापर केले जात नाहीत.

हे वाचा -  Alert!बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा;सर्व्हेतून धक्कादायक खुलासा,काय आहे कारण

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशात असंही म्हटलंय, की ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिम कार्ड आढळले, तर त्यांना त्यांच्या आवडीचे सिम कार्ड ठेवण्याचा आणि बाकीचे बंद करण्याचा पर्याय दिला जाईल. परंतु त्याची मर्यादा 9 हून अधिक नसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात