मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /2000 रुपयांहून कमी किमतीत घ्या 4G चा आनंद, 2 वर्षांपर्यंत करावा लागणार नाही रिचार्ज

2000 रुपयांहून कमी किमतीत घ्या 4G चा आनंद, 2 वर्षांपर्यंत करावा लागणार नाही रिचार्ज

रिलायन्स जिओचा (Reliance Jio) एक फीचर फोन 2000 रुपयांहून कमी किंमतीत येतो, तसंच या 4G कनेक्टिविटीचाही फायदा घेता येतो.

रिलायन्स जिओचा (Reliance Jio) एक फीचर फोन 2000 रुपयांहून कमी किंमतीत येतो, तसंच या 4G कनेक्टिविटीचाही फायदा घेता येतो.

रिलायन्स जिओचा (Reliance Jio) एक फीचर फोन 2000 रुपयांहून कमी किंमतीत येतो, तसंच या 4G कनेक्टिविटीचाही फायदा घेता येतो.

नवी दिल्ली, 19 जानेवारी : Smartphone च्या काळात आजही फीचर फोनचं (Feature Phone) महत्त्व कमी झालेलं नाही. कॉम्पॅक्ट साइजसह कमी किंमतीत फीचर फोन उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओचा (Reliance Jio) एक फीचर फोन 2000 रुपयांहून कमी किंमतीत येतो, तसंच या 4G कनेक्टिविटीचाही फायदा घेता येतो.

Reliance Jio च्या फीचर फोनमध्ये 2.4 इंची क्यूवीजीए डिस्प्ले (QVGA) देण्यात आला आहे. या फोनला 1500 mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन 9 तास टॉकटाइमचा आनंद देऊ शकतो. फोनला 128GB एसडी कार्ड (SD Card) लावता येऊ शकतं. त्याशिवाय यात युजर्सला 3.5 mm चा हेडफोन जॅकही मिळतो.

रिलायन्स 4G फीचर फोन (Reliance 4G Feature Phone) केवळ 2000 रुपयांत उपलब्ध आहे. हा फोन अधिकृत वेबसाइटवर लिस्टेड आहे. या किंमतीत युजरला एक 4G मोबाइल फोन, यात दोन वर्षांसाठी अनलिमिटेड कॉल आणि इंटरनेट डेटा मिळतो. म्हणजेच हा फोन घेतल्यानंतर दोन वर्षांपर्यंत कोणताही रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.

हे वाचा - Amazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone

रिलायन्स जिओशिवाय नोकियासह (Nokia) अनेक ब्रँड्सने आपले मोबाइल लाँच केले. परंतु Reliance Jio 4G कनेक्टिविटीसह येणारा सर्वात पहिला फीचर फोन आहे.

हे वाचा - WhatsApp वरच करता येणार Jio Prepaid Recharge, लवकरच येणार नवं फीचर

दरम्याम, Jio आणि Google या दोघांनी मिळून JioPhone Next विकसित केला आहे. JioPhone Next सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असून फोनला जबरदस्त फीचर्सही देण्यात आले आहेत. Jio ने JioPhone Next त्यांच्या इतर सेवांप्रमाणे मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया आणि मेड बाय इंडियन्स असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीयाला समान संधी आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा समान वापर करता यावा हे या फोनचं खास उद्दिष्ट आहे. तसंच JioPhone सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

First published:

Tags: Phone, Reliance Jio, Tech news