मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp ला टक्कर देणारं Gmail चं नवं भन्नाट फीचर? आता युजर्सला मिळणार नवी सुविधा

WhatsApp ला टक्कर देणारं Gmail चं नवं भन्नाट फीचर? आता युजर्सला मिळणार नवी सुविधा

Gmail चं फीचर इतर इन्स्टंट मेसेजिंग सारखंच आहे. युजर्स Updated App द्वारे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करू शकतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : Gmail द्वारे आता कॉलदेखील करता येणार आहे. Google ने ही सुविधा सुरू केली आहे. Google च्या या फीचरचा वापर करण्यासाठी युजरकडे Gmail चं लेटेस्ट वर्जन अपडेट असणं गरजेचं आहे. हे फीचर केवळ Gmail App युजर्ससाठीच दिलं जात आहे.

Gmail चं फीचर इतर इन्स्टंट मेसेजिंग सारखंच आहे. युजर्स Updated App द्वारे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करू शकतात. Gmail मध्ये युजर्सला ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसाठी चॅट टॅब मिळेल. युजरने या टॅबवर क्लिक केल्यानंतर संबंधित व्यक्तीशी वन-ऑन-वन कॉल करता येईल. Google ने आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्रुप कॉलची सुविधा दिलेली नाही.

Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

Gmail ओपन करुन Chats टॅबवर क्लिक करावं लागेल. Google Workspace युजर्ससाठी हा ऑप्शन डिफॉल्ट एनेबल असतो. रेग्युलर युजर्सला Chats ऑप्शन सेटिंगमध्ये एनेबल करावा लागेल. चॅट सेक्शनचे सर्व Conversations लिस्टमध्ये मिळतील. यापैकी एकावर टॅप करा. वरच्या बाजूला फोटो किंवा व्हिडीओ आयकॉनवर टॅप करुन ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करता येईल.

Google Photos: सुरक्षित ठेवता येतील तुमचे फोटो-व्हिडीओ, नव्या फीचरद्वारे करा लॉक

Gmail वर जर कॉल आला तर, रेग्युलर फोन कॉलप्रमाणे फ्लोटिंग कॉल नोटिफिकेशन मिळेल. Gmail युजर्सला मिसकॉल अलर्टचंही नोटिफिकेशन मिळेल. हे फीचर सध्या मोबाइल डिव्हाइससाठी आहे. वेबसाठी हे फीचर सध्या उपलब्ध करण्यात आलेलं नाही. WhatsApp प्रमाणे Gmail Calls देखील इंटरनेट बेस्ड असून यासाठी इंटरनेट कनेक्टिविटी असणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Gmail, Google, Tech news