मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

भारतीय Parag Agrawal यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार हाती घेतला. ते सीईओ झाल्यानंतर आता LinkedIn ची एक पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यात पराग अग्रवाल यांचा सीवी (CV) पाहण्यात आला आहे.

भारतीय Parag Agrawal यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार हाती घेतला. ते सीईओ झाल्यानंतर आता LinkedIn ची एक पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यात पराग अग्रवाल यांचा सीवी (CV) पाहण्यात आला आहे.

भारतीय Parag Agrawal यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार हाती घेतला. ते सीईओ झाल्यानंतर आता LinkedIn ची एक पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यात पराग अग्रवाल यांचा सीवी (CV) पाहण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : मागील आठवड्यात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter चे CEO Jack Dorsey यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भारतीय Parag Agrawal यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार हाती घेतला. पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ झाल्यानंतर भारतासह जगभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ते सीईओ झाल्यानंतर आता LinkedIn ची एक पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यात पराग अग्रवाल यांचा सीवी (CV) पाहण्यात आला आहे.

Mastech Digital चे सीनियर रिक्रूटर निश्चय जैन यांनी पराग अग्रवाल यांचा CV शेअर केला होता. हा CV प्रचंड व्हायरल झाला असून त्यातील काही गोष्टींवर मोठी चर्चा होते आहे.

निश्चय जैन यांनी पराग अग्रवाल यांच्या व्हायरल झालेल्या CV मध्ये त्यांच्या प्रत्येक नोकरीदरम्यान अनेक महिन्यांचा गॅप असल्याचं म्हटलं आहे. याबाबत CV ची मोठी चर्चा आहे. त्यांच्या प्रत्येक नोकरीतील गॅप सहा महिन्यांहून अधिक आहे.

ट्विटरमध्ये काम करण्याआधी पराग अग्रवाल AT&T Labs मध्ये काम केलं होतं. आधीची नोकरी सोडण्याआधी आणि ट्विटरमध्ये जॉईन होण्यादरम्यान 12 महिन्यांचा अर्थात वर्षभराचा गॅप होता.

जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

त्याआधी पराग अग्रवाल यांनी सर्वात आधी Microsoft मध्ये नोकरी केल्यानंतर ते Yahoo मध्ये जॉईन झाले. या दोन जॉबदरम्यान नऊ महिन्यांचा गॅप होता. त्यानंतर Yahoo तून पुन्हा Microsoft Corporation जॉईन करण्याआधी आठ महिन्यांचा गॅप घेतला गेला होता. तेथून AT&T Labs मध्ये जाताना त्यांनी आठ महिन्यांचा गॅप घेतला असल्याची माहिती आहे.

फोटोत दिसणाऱ्या या आई-वडिलांसाठी अभिमानास्पद क्षण, मुंबईकर मुलाची जगभर चर्चा

निश्चय जैन यांनी हा CV शेअर करत यातील महत्त्वपूर्ण बाब अर्थात दोन जॉबमधील गॅम अधोरेखित केला आहे. आज ट्विटरने त्यांचा हा गॅप पाहून त्यांना नोकरी दिली नसती, तर आज इतका सक्षम सीईओ त्यांना मिळाला नसता, असं निश्चय जैन यांनी म्हटलं. त्यामुळेच त्यांनी जे लोक उमेदवारांच्या CV मध्ये गॅप पाहून त्यांना नोकरी देत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news, Twitter, Twitter account