नवी दिल्ली, 7 डिसेंबर : Google ने आपल्या युजर्ससाठी नवं सेफ्टी फीचर लाँच केलं आहे. या फीचरद्वारे तुमच्या फोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ कायमसाठी सेफ राहतील. या फीचरचं नाव Google Photos Locked Folder आहे. ज्यात युजर Photos App मध्ये लॉक्ड फोल्डरची सर्विस मिळवू शकतात. यामुळे तुमचे फोटो-व्हिडीओ फ्रॉड आणि इतर कोणाच्याही हातात पडण्यापासून बचाव होईल. हे फोल्डर तुम्ही फोनच्या पासवर्ड, फिंगरप्रिंट, पॅटर्न किंवा लॉकने अॅक्सेस करू शकता.
Google ने पिक्सल युजर्सशिवाय इतर अँड्रॉइड युजर्ससाठीही लॉक्ड फोल्डर फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे फीचर Samsung आणि Oneplus डिव्हाइसमध्ये सुरू झालं आहे.
Google चं हे नवं फीचर सध्या अँड्रॉइड 6.0 मध्ये वापरता येऊ शकतं. त्यानंतर हे इतर वर्जनसाठी उपलब्ध होईल. हे फीचर आल्यानंतर युजरला Google कडून याबाबत नोटिफिकेशन मिळेल.
Google Photos मध्ये लॉक केलेल्या फोल्डरमध्ये एका पासकोडसह तुम्ही फोटो सुरक्षित ठेवू शकता. हे फोटो तुमच्या App मध्ये स्क्रोल करताना दिसणार नाहीत. या लॉक्ड फोल्डरमधील फोटोचे स्क्रिनशॉट काढता येणार नाहीत. फोटो शेअरदेखील करता येणार नाहीत. हे फोटो अॅक्सेस करण्यासाठी डिव्हाइस स्क्रिन लॉकची गरज असेल.
कसा कराल वापर?
या फोल्डरसाठी तुमच्या स्मार्टफोनवर पासवर्ड असणं गरजेचं आहे. आता Google Photos मध्ये हाइड करायचे फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट करा, जे तुम्हाला लॉक्ड फोल्डरमध्ये मूव्ह करायचे आहेत. आता उजव्या बाजूला More वर क्लिक करुन Move to Locked Folder वर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.