मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

युजर्सकडून Gmail वरील कोणता डेटा गोळा केला जातो; Google ने केला खुलासा

युजर्सकडून Gmail वरील कोणता डेटा गोळा केला जातो; Google ने केला खुलासा

युजर्सला आता गुगल (google)  त्यांच्या मेल (gmail) मधला कोणता डेटा गोळा करतं, याची माहिती मिळू शकणार आहे.

युजर्सला आता गुगल (google) त्यांच्या मेल (gmail) मधला कोणता डेटा गोळा करतं, याची माहिती मिळू शकणार आहे.

युजर्सला आता गुगल (google) त्यांच्या मेल (gmail) मधला कोणता डेटा गोळा करतं, याची माहिती मिळू शकणार आहे.

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: अ‍ॅपलने (Apple) आपल्या अ‍ॅप स्टोअरवर प्रायव्हसी लेबल लावलं आहेत. त्यानंतर आता गुगलने (Google) देखील आपल्या जीमेलच्या आयओएस (IOS) अ‍ॅपवर प्रायव्हसी लेबल लावले आहेत. यामुळे युजर्सना त्यांच्या मेलवरील (GMail) कोणता डेटा गुगल गोळा करतं याचीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 8 डिसेंबर 2020 पासून सुरू केलेल्या सर्व iOS अ‍ॅप्ससाठी प्रायव्हसी लेबल (Privacy Label) अनिवार्य केलं आहे. यामुळे अ‍ॅप्स आपला वैयक्तिक डेटा कसा संकलित करतं याची माहिती युजर्सना मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी गुगलने युट्युबसाठी (Youtube) हे प्रायव्हसी लेबल लागू केलं होते. त्यानंतर आता जीमेलसाठी देखील हे लागू करण्यात आलं असून भविष्यात गुगल फोटोज, ड्राइव्ह आणि गुगल मॅपसाठी देखील हे प्रायव्हसी लेबल लागू होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गुगलची जीमेल सेवा वापरत असाल, तर तुमच्याकडून गुगल काही माहिती गोळा करत असतं. आयओएस युजर्सबरोबरच अँड्रॉइड युजर्ससाठी देखील हे प्रायव्हसी लेबल सारखंच आहे.

जीमेल वापरकर्त्यांकडून Google संकलित करते, त्या वैयक्तिक डेटाची तपशीलवार यादी येथे आहे.महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिक वापरासाठी वापरलं जाणारं जीमेल अकाउंट आणि वैयक्तिक वापरासाठी वापरलं जाणारं जीमेल अकाउंट या दोन्हीची प्रायव्हसी पॉलिसी वेगळी आहे.

(वाचा -  ...तर 15 मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही; जाणून घ्या नव्या पॉलिसीबाबत)

यामध्ये थर्ड पार्टी जाहिरातीसाठी (Third Party Adverisement) गुगल वेगवेगळ्या प्रकारचा डेटा गोळा करत असतं. यामध्ये तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन, युजर आयडी आणि तुम्ही जाहिरातीमध्ये किती डेटा वापरला आहे याची माहिती गुगल गोळा करत असतं. थर्ड पार्टी जाहिरातीसाठी गुगलला याचा फायदा होत असून यामुळे युजर्सला कोणत्या जाहिरातीमध्ये रस आहे याचा तपास यातून होतो. ऍनालिसिस करण्यासाठी देखील गुगलला याचा फायदा होतो.

या पद्धतीचा डेटा गुगल युजर्सकडून गोळा करतो-

डेटा हिस्ट्री, लोकेशन, ईमेल अ‍ॅड्रेस, फोटो किंवा व्हिडीओ, ऑडिओ डेटा, अन्य वापरकर्त्याची सामग्री, सर्च हिस्ट्री, युजर आयडी, डिव्हाइस आयडी, वापरलेला डेटा, जाहिरात डेटा, क्रॅश डेटा, परफॉरमन्स डेटा आणि अशा अनेक प्रकारचा डेटा गुगल आपल्या युजर्सकडून गोळा करतो.

(वाचा - ...तर 15 मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही;जाणून घ्या नव्या पॉलिसीबाबत)

कोणते अ‍ॅप, तुमचा कोणता डेटा गोळा करतं हे कसं तपासाल?

कोणतं अ‍ॅप तुमचा कोणता डेटा गोळा करत आहे हे तपासण्यासाठी अ‍ॅपलने अतिशय सोपी पद्धत तयार केली आहे. यामध्ये तुम्ही अ‍ॅप स्टोअरमध्ये, अ‍ॅप शोधून प्रायव्हसी सेक्शनमध्ये यासंदर्भातील माहिती मिळवू शकता. याच पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे आयफोन नसल्यास डेस्कटॉपवर, अ‍ॅप स्टोअरच्या वेबसाईटवर देखील यासंदर्भातील माहिती मिळवू शकता.

First published:

Tags: Apple, Gmail, Google, Privacy, Tech news, Technology, User data, Youtube