मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

...तर 15 मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही; जाणून घ्या नव्या पॉलिसीबाबत

...तर 15 मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही; जाणून घ्या नव्या पॉलिसीबाबत

व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये लागू करण्यात आलेल्या अटी पर्सनल मेसेजवर परिणाम करत नाही. हे बदल व्हॉट्सअ‍ॅपवरील ऑप्शनल बिझनेस फीचर्सशी संबंधित आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसी 15 मेपासून लागू होणार आहे. युजर्सकडे आणखी काही महिने असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. परंतु युजर्सनी जर ही नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट केली नाही, तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या मर्चेंट सपोर्टला पाठवण्यात आलेल्या एका ईमेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जे युजर्स 15 मेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करणार नाहीत, ते या अ‍ॅपवर आलेले मेसेज (WhatsApp Message) वाचू शकणार नाही तसंच युजरला कोणालाही मेसेज पाठवता येणार नाहीत. केवळ काही दिवसच युजर्स कॉल आणि नोटिफिकेशन रिसिव्ह करू शकतात.

ईमेलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारा तयार करण्यात आलेल्या FAQ पेजची लिंक आहे. जे युजर्स नवीन प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करणार नाहीत, ते 15 मेपूर्वी आपलं अकाउंट डिलीट करू शकतात, रिपोर्ट डाउनलोड करू शकतात आणि आपले जुने चॅट्स इंपोर्ट करू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये लागू करण्यात आलेल्या अटी पर्सनल मेसेजवर परिणाम करत नाही. हे बदल व्हॉट्सअ‍ॅपवरील ऑप्शनल बिझनेस फीचर्सशी संबंधित आहेत.

(वाचा - नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय होणार बदल; WhatsApp ने दिली माहिती)

WhatsApp ने अपने FAQ पेज पर इस बात की जानकारी दी है.

ही नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर युजर्सचा डेटा कोणत्याही पद्धतीनं लीक होणार नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. हा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार असल्यानं फेसबुक किंवा व्हाट्सअ‍ॅप तो पाहू शकणार नाहीत, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीला 8 फेब्रुवारी रोजी हे बदल लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु युजर्समधील गोंधळाचं वातावरण आणि मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर ही पॉलिसी पुढे ढकलण्याचं ठरवलं होतं. आता युजर्सला 15 मेपर्यंत नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागणार आहे, अन्यथा अकाउंट बंद होऊ शकतं.

First published:

Tags: India, Privacy, Tech news, Technology, Whatsapp chat, Whatsapp messages