नवी दिल्ली, 24 जानेवारी : इंटरनेटच्या
(Internet) जगात जवळपास सर्वच कामं ऑनलाइन (Online) होऊ लागली आहेत. कोरोना काळात तर इंटरनेटचा वापर अधिकच
(Internet use in Corona Pandemic) वाढला आहे. वर्क फ्रॉम होम
(Work from Home) ते अनेक बँकिंग संबंधित कामं, पेमेंट, मिटिंग्स, मनोरंजन अशा अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या. याच काळात व्हिडीओ गेम
(Video Games) खेळण्याचं प्रमाणही अतिशय वाढलं. येणाऱ्या काही काळात गेमर्सला
(Gamers) व्हिडीओ गेम कंपन्या गेम खेळण्यासाठी पैसे देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सर्वसाधारणपणे गेमर्सला व्हिडीओ गेम खरेदी करावा लागतो किंवा गेमसाठी फीचर्सचा वापर करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे गेमर्सला आपल्या आवडीचा गेम खेळण्यासाठी पैसे भरावे लागतात. परंतु पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटचे
(Reddit) फाउंडर ऐलेक्सिस ओहेनियन यांनी व्हिडीओ गेम खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी सांगतिलं, की पुढील पाच वर्षात काही असे बदल होतील, की गेमिंग कंपन्या गेमर्सला गेम खेळण्यासाठीच पैसे देतील. Reddit फाउंडर ऐलेक्सिस ओहेनियन यांनी वेयर इट हॅपन्स
(Where it happens) नावाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, की असा अंदाज वर्तवला जात आहे की पाच वर्षात ऑनलाइन सर्विसेज आणि प्लॅटफॉर्मचा वापर करणारे 90 टक्के लोक डिसेंट्रेलाइज्ड ऑटोनॉमस ऑर्गेनायजेशन किंवा DAO चा भाग होतील.
पुढील काही वर्षात व्हिडीओ गेम्समध्ये प्ले टू अर्न गेम्सचा
(Play to earn games) ट्रेंड असेल. ज्यावेळी गेमर्स आपला वेळ खेळण्यासाठी देतील, त्यावेळी कंपन्यांचा प्रयत्न त्या वेळेऐवजी त्यांना पैसे देण्याचा असेल, असंही ते म्हणाले. येणाऱ्या काळात गेमिंग इंडस्ट्री (Gaming Industry) अतिशय मोठी इंडस्ट्री ठरेल, असा अंदाजआहे. यातून होणाऱ्या सेल्सचा आकडा हॉलिवूड आणि म्यूझिक इंडस्ट्रीच्या एकत्रित सेल्सला पार करेल असंही बोललं जात आहे.
दरम्यान,
Google Play Store वर काही असे Apps आहे, जे गेम खेळण्यासाठी पैसे देतात. देशात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर पैसे कमावण्यासाठी अनेकांनी असे पर्याय शोधले.
Online Survey -
अनेक कंपन्या सतत सर्व्हे करत असतात. गुगल प्ले स्टोरवर अनेक असे Apps आहेत, जे सर्व्हेच्या बदल्यात युजरला पेमेंट करतात. या सर्व्हेतून दररोज 800 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. Google Play Store वर असे अनेक Apps आहेत, जे गेम खेळण्यासाठी पैसे देतात. हे Apps गेम खेळून ते टेस्ट करण्याची संधी देतात. त्यासाठी गेम खेळणाऱ्या व्यक्तीला एक फिक्स्ड अमाउंट दिली जाते. ही अमाउंट Working Hours वर अवलंबून आहे. अधिक गेम खेळल्यास जास्त पैसे आणि कमी खेळल्यास त्या हिशोबाने पैसे मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.