मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /खांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव; काही मिनिटांत पोहोचली Ambulance

खांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव; काही मिनिटांत पोहोचली Ambulance

आता एयरपॉड्स (AirPods) महिलेसाठी अधिक मूल्यवान ठरले आहेत. AirPods मुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.

आता एयरपॉड्स (AirPods) महिलेसाठी अधिक मूल्यवान ठरले आहेत. AirPods मुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.

आता एयरपॉड्स (AirPods) महिलेसाठी अधिक मूल्यवान ठरले आहेत. AirPods मुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली, 24 जानेवारी : अ‍ॅपल (Apple) चे अनेक प्रोडक्ट्स अनेकदा युजर्ससाठी जीवन रक्षक ठरले आहेत. अ‍ॅपल वॉच (Apple Watch) ला मोठ्या प्रमाणात एखाद्या दुर्घटनेवेळी जीव वाचवल्याचं श्रेय देण्यात आलं आहे. पण आता एयरपॉड्स (AirPods) महिलेसाठी अधिक मूल्यवान ठरले आहेत. AirPods मुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.

न्यू जर्सीतील एक महिला सुसान पुटमॅन हिच्या कानात नेहमी एयरपॉड्स (AirPods) असायचे. ती फुलांच्या दुकानात काम करते. एकदिवस अचानक ती जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्यातून रक्तही वाहू लागलं. या घटनेवेळी तिच्या आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हतं. पुढे लगेच तिने आपल्या AirPods वर सिरीचा (Siri) उपयोग करुन एक अ‍ॅम्बुलेन्स बोलवली.

पीपलच्या एका रिपोर्टनुसार, सुसान पुटमॅनने एका खांबाला धडकून पडल्यानंतर तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर अ‍ॅम्बुलेन्स बोलवण्यासाठी तिने एयरपॉड्सचा वापर केला. तिने म्हटंल, मी एक हार बनवत असताना अचानक 8 फूट खाली पडले आणि एक खांब माझ्या डोक्याला लागला.

हे वाचा - बाजारात आला Smart Bed; Anti-Snoring Mode,ऑटोमेटिक मसाजसह मिळतील थक्क करणारे फीचर

या दुर्घटनेवेळी ती दुकानात एकटी होती. खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तिच्या आजू-बाजूला असं कोणीही नव्हतं, ज्याच्याकडे ती मदत मागू शकेल. पण तिच्या कानात एयरपॉड्स होते आणि तिने 911 वर कॉल करण्यासाठी सिरीचा (AirPods Siri) उपयोग केला.

पीपलला दिलेल्या माहितीत तिने सांगितलं, की खाली कोसळल्यानंतर मी माझ्या डोक्याला हात लावला, तर रक्त आल्याचं माझ्या लक्षात आलं.  त्याचवेळी माझ्या कानाला एयरपॉड्स असल्याचंही मला लक्षात आलं. रक्त आल्याने मी घाबरले आणि जोरात 'Hey Siri Cal 911 ' असं मी ओरडले. सिरीने 911 डायल केलं आणि काही वेळातच पोलीस आणि पॅरामेडिक्स घटनास्थळी पोहोचले.

हे वाचा - VIDEO: रिक्षा आहे की लक्झरी कार,ऑटोच्या भन्नाट मोडिफिकेशने Anand Mahindraही चकित

AirPods वर असं अ‍ॅक्टिव्ह करा Siri -

AirPods केवळ गाणी ऐकण्यासाठीच नाही, तर इतर कामांसाठीही वापरता येतो. Siri AirPods Pro, AirPods 2, AirPods 3 आणि AirPods Max वर उपलब्ध आहे. जर ही सुविधा तुमच्या iPhone वर अ‍ॅक्टिव्ह असेल, तर AirPods वरही अ‍ॅक्टिव्ह होईल. AirPods वर Siri अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सेटिंगमध्ये Siri and Serch वर जा. इतर पर्यायांमध्ये Listen for Hey Siri वर क्लिक करा.

AirPods Pro आणि AirPods 3 वर Force Sensor दाबूनही Siri अ‍ॅक्टिव्ह करता येतं. AirPods आणि AirPods 2 वर Hey Siri अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी AirPods च्या कडेला डबल टॅप करा.

First published:
top videos

    Tags: Apple, Tech news