नवी दिल्ली, 23 जानेवारी : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आपल्या ट्विटमुळे, खास पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ते नेहमीच अशा लोकांबद्दल पोस्ट करतात, लिहितात ज्यांनी काहीतरी हटके-ऑउट ऑफ द बॉक्स करण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी असंच हटके काम करणाऱ्या एक व्यक्तीसाठी केलेलं ट्विट (Anand Mahindra Tweet) चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका ऑटो रिक्षा ड्रायव्हरला मॅनेजमेंटचा प्रोफेसर अशी उपमा दिली आहे. एवढंच नाही, तर त्यांनी थेट महिंद्रा इलेक्ट्रिकच्या CEO ला या ऑटो ड्रायव्हरकडून काही शिकण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या खास ट्विटमागे कारणंही तितकंच खास आहे.
बेटर इंडियाने चेन्नईतील एक ऑटो ड्रायव्हर अन्ना दुराई (Anna Durai) यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. यात अन्ना यांच्या अनोख्या मॅनेजमेंट स्किलबाबत सांगण्यात आलं होतं. आनंद महिंद्रा यांनी याच ट्विटवरुन अन्ना यांना मॅनेजमेंट प्रोफेसर असं म्हटलं आहे. 'जर एमबीएच्या विद्यार्थ्यांनी या ड्रायव्हरसोबत एक दिवस घालवला, तर ते Customer Experience Management कम्प्रेस्ड कोर्ससारखंच होईल. हा व्यक्ती केवळ ऑटो ड्रायव्हर नसून मॅनेजमेंटचा प्रोफेसर आहे' अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
त्यांनी केवळ अन्ना यांच्याबद्दल कौतुकास्पद ट्विटच केलं नाही, तर त्यांच्या महिंद्रा इलेक्ट्रिकचे (Mahindra Electric) CEO सुमन मिश्रा यांना टॅग करत, यांच्याकडून काही शिकण्याचा सल्लाही दिला आहे.
अन्ना दुराई चेन्नईत ऑटो चालवतात. ते चेन्नईत अतिशय प्रसिद्ध असून अतिशय सुंदर इंग्रजीही बोलतात. त्यांची रिक्षा सर्वसामान्य रिक्षा नसून त्यांच्या रिक्षात Wifi, टीव्ही, छोटासा फ्रीज, लॅपटॉप आणि टॅबलेट, मॅगझिन, वृत्तपत्र अशा वस्तू आहेत. एवढंच नाही, तर कोरोना काळात हँड सॅनिटायझर आणि मास्कही ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व हाय-क्लास सोयी-सुविधांसाठी ते कोणताही अतिरिक्त चार्ज घेत नाहीत. बेटर इंडियाने अन्ना यांची रिक्षा आणि त्यांच्या आयुष्यावर एक व्हिडीओ बनवला आहे.
Watch: #Chennai's Auto Anna can give #startups a run for their money! Anna Durai didn’t have a fancy degree from a business school or any family-owned business to learn the trade. But he knew from ‘day one’ that ‘Customer is King’. @anandmahindra @ErikSolheim pic.twitter.com/efhGvlAp9U
— The Better India (@thebetterindia) January 21, 2022
अन्ना दुराई यांचं मॅनेजमेंट स्किल अनेक कंपन्यांना चांगलंच आवडलं आहे. त्यामुळेच अन्ना यांनी आतापर्यंत हुंड्ई (Hyundai), वोडाफोन (Vodafone) आणि रॉयल इन्फील्ड (Royal Enfield) तसंच Danfoss and Gamesa सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक युक्त्या दिल्या आहेत. त्याशिवाय कॉर्पोरेट ऑफिसेजमध्ये त्यांनी 40 स्पीच दिले असून 6 TED टॉक्स (TED talks) देखील केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Chennai